डहाणू | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली आणि नवसाला पावणारी महालक्ष्मी ची यात्रा एप्रिल महिण्यात २३ तारखे पासून सुरु होत असून या यात्रेत येणाऱ्या भाविक आणि स्थानिक व्यापारी यांच्या असलेल्या समस्या जाणून त्यावर प्रशासनाशी बोलून उपाय काढण्याचे काम भूमिपुत्र संघटनेने केले आहे. त्या साठी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी आणि जिल्हा अध्यक्ष जावेद लुलानिया तसेच सल्लागार हर्बन्स सिंग नन्नाडे आणि शाम सुंदर चौधरी यांनी प्रयत्न केले.
यात्रेत पालघर जिल्ह्यासह बाजूच्या गुजरात,सेल्वास,आणि इतर भागातून मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात,या भाविकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत असून,गाड्यांची पार्किंग,जेवण,पिण्याचे पाणी,ते स्वच्तागृह याची सोय करण्यात मंदिर प्रशासन अपुरे पडत असून,यात्रेत येणारे भाविक हे गोर गरीब आदिवासी बांधव असतात,त्यांची सोय हि शासनातर्फे करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.