–जिल्हा निर्मिती ते जिल्ह्याचा विकास हेच ध्येय
- आशिया खंडातील सर्वात मोठा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली म्हणून पालघर जिल्ह्याचे शिल्पकार निर्माते म्हणून राजेंद्र गावित ह्यांची ख्याती आहे.
- जहाज दुरुस्ती, जल वाहतूक, धूप प्रतिबंधक बंधारे, जेटी उभारणे तसेच JNPT ते ठाणे ते घोडबंदर मीरा भाईंदर ते वसई वि
- रार अशी रो-रो सेवा सुरू करावी ह्या संदर्भात संसदेत मागणी
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मीरा-भाईंदर वसई-विरार पाणी पुरवठा योजने अंतर्गत मुंबई- अहमदाबाद महामार्गालगतच्या 76 गावांना पाणी पाणी पुरवठा मंजुर केला.
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत टेंभी खोडावे (पालघर) ते मरंबळपाडा (विरार) सागरीसेतू मार्गाला 675 कोटी रु मंजुरी करून पालघर-विरार सागरी सेतू मार्गाने जोडणार
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत खारेकुरण-मुरबे सागरी मार्ग करिता निधी मंजूर.
- डहाणू नाशिक तसेच कसारा खोडाला-मोखाडा-जव्हार सविस्तर प्रकल्प अहवाल(डीपीआर) करिता संसदीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित.
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत मीरा भाईंदर ते वसई विरार करिता मेट्रो ट्रेनची मागणी.
- राज्यातच नव्हे तर देशातील १ नंबर च मॉडेल म्हणून पालघर जिल्हा रुग्णालय करिता मंजुरी देऊन पालघर पूर्व येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात ह्या करीता 210 कोटी मंजूर.
- पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या 6 मोठया योजनाकरिता राज्य शासन कडून 1248 कोटी रु मंजूर.
- वसई येथे पासपोर्ट कार्यालय सुरू
- केंद्रीय अमृत योजने अंतर्गत घनकचरा व बंदिस्त गटार ह्या करिता वसई विरार महानगर पालिके करिता 1001 कोटी इतका निधी मंजूर करून इतिहास रचला.
- पालघर DFCC रेल्वे कॉरिडॉर मध्ये बधितांना पनर्वसन म्हणून दुप्पट सानुग्रह अनुदान मंजूर करून दिले.
- कोविड 19 महामारी मध्ये एक कर्तव्यपर सुजान समाजसेवक म्हणून सेवा
- प्रधानमंत्री व मुख्यमंत्री व खासदार वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून रुग्णसेवा.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, कौशल्य विकास माध्यमातून स्थानिकांना रोजगार ,शेती पूरक व्यवसाय करिता सबसिडी तत्त्वावर भाग भांडवल मंजूर करून स्वयंरोजगार उपलब्ध केलेत. १०० च्या वर फूड व्हॅन, टेम्पो, पिक उप, टॅक्सी कार इ.वाहने उपलब्ध करून दिलीत
- पालघर जिल्यातील 215 न जोडलेल्या गाव पाडे व बेट रस्ता व दळणवळणाच्या साधनाने जोडण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा.
- सातपाटी मासेमारी बंदर विकास करिता केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभाग कडून 281 कोटी रु मंजुर
- डहाणू-कासा-जव्हार-मोखाडा-नाशिक रेल्वे मार्ग मनरेगा व mrvgs रोजगार हमी योजने अंतर्गत प्रकल्प करून रोजगार व दळणवळण रेल्वेमार्ग सुरू करावा
- Mumbai Rail Vikas Corporation मार्फत विरार डहाणू ६५किमी लांबीच्या कामासाठी ३६०० कोटी खर्च करून २ नवीन रेल्वेलाईनचे काम पूर्ण झाले असून विरार- डहाणू उपनगरीय रेल्वे सेवांची संख्या व वारंवारिता वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा विरार-डहाणू दरम्यान भुयारी मार्ग व डहाणू पूल मंजूर
- NHAI- नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया मार्फत NH.48 वर होणारी वाहतूक कोंडी, रस्त्याची दूरव्यवस्था ह्या करिता रस्ते विकास-केंद्रीय मंत्री यांच्या मार्फत 650 Cr रु निधी मंजूर करून White Taping व 400 पथ दिवेच्या कामांना सुरुवात
- मुलां- मुलींच्या वस्तीगृहाची संख्या विद्यार्थी क्षमता वाढवणे तसेच आदिम आदिवासी जमाती करिता घरकुल, वनहक्क दावे मंजूर करणे, वनधन केंद्र मंजुरी तसेच बहुउद्देशीय केंद्र करिता आदिवासी विकास मंत्रालय स्तरावर सतत प्रयत्न
- जव्हार येथे 200 खाटांच्या रुग्णालय करिता 95 कोटीची तरतूद
- पंतप्रधान ग्रामसडक योजना, ग्रामविकास आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम विकास, पर्यटन विकास इ. विभागा मार्फत पुल व रस्ते विकास करिता कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर बिरसा मुंडा जोड रस्ता योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील न जोडलेले गाव पाडे ह्या करिता सर्वाधिक निधी पालघर करिता मंजूर
- केळवे शिरगाव, चिंचणी, डहाणू, बोर्डी बीच, जव्हार इ. पर्यटन क्षेत्र विकास करिता केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्या कडे अहवाल सादर
- NH.48 महामार्गावर एकूण 10 उड्डाणपूल व ५ पथ पदचारी पूल मंजूर
- पालघर जिल्ह्यातील ताडी-माडी उत्पादन व विक्री संस्थाच्या मागण्या शासन स्तरावर मांडून २५% सवलत, FLR परवाना पद्धतीने प्रमाणे परवाना, इ. योजनांची मागणी
- प्रधानमंत्री रोजगार योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना मुद्रा लोन, जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास मंडळ तसेच विविध महामंडळ तर्फे रोजगार व स्वयंरोजगार करिता मेळावे
* अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत पालघर स्थानकाचा समावेश
पालघर स्थानक होणार नूतनीकरण करिता 80कोटी रु ची तरतूद
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पायाभरणी (ऑनलाईन)
“खासदारांनी साधला थेट शेतकऱ्यांशी सवांद”
दि. १५/०३/२०२४, वसई पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या शेती संबधी समस्या बाबत शेतकऱ्यांची सभा वाघोली, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आयोजित केली होती. सदर सभेत खासदार राजेंद्र गावित यांनी शेती संबधी विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले, त्याच प्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने बाबत शेतकऱ्याना असलेल्या शंका व त्यांना येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यास संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यास आव्हान केले.
सदर सभेस श्री. एन. डी. शिंदे – कृषी मंडळ अधिकारी, श्रीमती एस. बी. घायवट – कृषी सहाय्यक, तसेच श्री. दत्ता सांबरे – अध्यक्ष आदिवासी एकता परिषद, प्रकाश आल्मेडा – वरिष्ठ कार्यकर्ते जनता दल, नवीन दुबे – लोकसभा समन्वयक, मनोज पाटील – वसई विधानसभा प्रमुख BJP, संजोग यंदे – OBC कोंकण विभाग संपर्क प्रमुख BJP, गोपाळ कोल्हे पाटील – नालासोपारा शहर प्रमुख आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पालघर नगरपरिषद करिता सोलार हायमास्ट व सोलार स्ट्रीट लाईट बसविण्याकरीता रु पाच कोटीची मंजुरी मिळाली होती.
त्यामध्ये 565 स्ट्रीट लाईट व 68 सोलार हायमास्ट पालघर नगर परिषदेच्या विविध वॉर्डमध्ये बसविण्यात आले. आज ह्या कामाचे लोकार्पण सोहळा खासदार राजेंद्र गावित व नगराध्यक्ष डॉक्टर उज्वला काळे तसेच सर्व नगरसेवक, जि प. मुख्य कार्यकारी अधिकारी, भानुदास पालवे, उपविभागीय पोलीस अधीक्षक नीता पाडवी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी, उमाकांत गायकवाड,उपस्थित होते.