पालघर / जावेद लुलानिया
पालघर शहरात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून,इदीच्या दिवशी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे जुलूस काढण्यात आला होता,या वेळी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला,तसेच जुलूस साठी राम मंदिर ट्रस्ट तर्फे पाणी वाटप करण्यात आले.
आणि हिंदू बांधवान कडून मुस्लीम बांधवाना इदीच्या शुभेच्या देण्यात आल्या.आणि हिंदू मुस्लीम ऐक्याचा आदर्श निर्माण करण्यात आला.त्या साठी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट ची मुख्य ट्रस्टी रफिक लुलानिया यांनी बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी आणि राम मंदिर ट्रस्टचे आभार मानले.