Palghar Nargrik

Breaking news

पालघर लोकसभा निवडणुक दिवसेंदिवस रंगतदार ..?

संपादकीय (मयूर ठाकूर )

 पालघर जिल्हा म्हणजेच लोकसभा मतदारसंघावर एकदा बहुजन विकास आघाडी आणि दोन वेळा शिवसेनेने राज्य केले आहे.पण सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना पक्ष फुटी नंतर या लोकसभेवर कोणाचं अस्तित्व टिकून राहणार आहे..? शिवसेना उबाठा गटा तर्फे संघर्ष कन्या म्हणून उद्धव ठाकरेंनी नाव ठेवलेलेआणि रश्मी ठाकरेंच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कोविड काळामध्ये कुठलेही लोकोपयोगी कामं केलेली नसलेली उमेदवार भारती कांबळी त्यांना तिकीट दिले आहे.तसेच या वेळी नव्याने पक्ष स्थापन करून नशीब आजमावणारे निलेश सांबरे यांनी कल्पेश भावर यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे पालघर लोकसभेवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहावयास मिळणार आहे.पालघर लोकसभा नागरी, डोंगरी आणि सागरी अशा सर्व गटामध्ये विभागले आहे.त्यामुळे या लोकसभेवर येणाऱ्या उमेदवाराचा विकासकामे करताना कस लागतो राजेंद्र गावित यांनी हे शिव धनुष्य सहज दोन वेळा पेलले आहे. काँग्रेस मधून आमदार राज्यमंत्री त्या नंतर भाजपा मार्गे शिवसेनेतून ते लोकसभेवर गेले आहेत.आणि आताही ते पक्ष बदलून परत भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत.

 भाजप की शिवसेना कोण देणार त्यांना तिकीट ? हा प्रश्न मतदारांच्या आणि खुद्द गावितांच्या मनात निर्माण झालेला आहे.

 त्यात आता लोकसभा उमेदवार देण्यासाठी फक्त एकाच पक्षाची वाट पाहावी लागणार आहे. ते म्हणजे बहुजन विकास आघाडी..? बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर कोणाला उमेदवारी देणार या कडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.जर ठाकुरांनी पुन्हा पालघर लोकसभेचे प्रथम खासदार बळीराम जाधवाना जर संधी दिली तर निवडणूक गावितांच्या पारड्यात जाईल आणि जर का बोईसर चे विद्यमान आमदार राजेश पाटीलाना संधी दिली तर गावितांना ही निवडणूक जड जाईल. अजून निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी नऊ दिवसांचा वेळ बाकी आहे. तसेच अर्ज मागे घेण्यासाठी एकोणीस दिवसांचा अवधी आहे. या वीस दिवसांमध्ये  पालघर लोकसभा मतदार संघात फार मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.तर वंचित बहुजन आघाडीने विद्यमान कुडनचे सरपंच विजया म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.त्या आता पालघर लोकसभेची किती मतं खाणार त्याच्यावरती निवडणुकीची गणित ठरणार आहे.विजया म्हात्रे या पालघर येथील स्वामी समर्थ मठाच्या विश्वस्त आहेत.तसेच त्यांना दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ सुजल शक्ती सन्मान विजेत्या पालघर जिल्ह्यातील पहिल्या सरपंच आहेत.त्या मुळे त्यांना वंचित बहुजन आघाडीने त्यांचे नशीब आजमावयाला पालघर लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

उबाठा गटाचे उमेदवार ह्यांनी जिल्ह्यातील आपल्याच पक्षपदाधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन रश्मि ठाकरेंना मस्का लाऊन उमेदवारी घेऊन आल्याचे शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी यांच्यात दबक्या आवाजात चर्चा आहे.भारती कामडी यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष काळात कोविड असल्याचे कारण देत विकास कामांना बंदी आणली होती,नेमके त्याच काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान होते.आपलेच पक्ष प्रमुख मुख्यमंत्री असल्याचा फायदा घेऊन जिल्ह्यासाठी भरीव विकास कामे आणणे शक्य असताना,त्यांनी तसे केले नाही.त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत कोविडनिधी चे कंत्राट हे आपल्या संबधातील व्यक्ती आणि संस्थाना देण्यात आले होते,असा आरोप हा त्यांच्या स्वपक्षीयांनीच केला आहे.तसेच D The Discover या संस्थेने केलेल्या चाचणी अहवालात शिवसेना उबाठा गटाचा उमेदवार पराभूत होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मतदानाच्या आदल्या दिवशी सुद्धा प्रचाराचा टोन बदलू शकतो..? असेही त्या अहवालात म्हंटले आहे.तसेच पालघर जिल्ह्यातील मुख्य भूमिपुत्र म्हणजे आदिवासी संघटनांनी भारती कामडी यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.त्यात ४८ विविध आदिवासी संघटना आणि ४५ जमाती सहभागी आहेत.या सर्व संघटनांच्या बैठकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार बदला अशी हाक देण्यात आली होती.लोकसभा मतदार संघात पेसा ग्रामपंचायतीचा समावेश मोठ्याप्रमाणावर असल्याने पेसा कायद्याची अंबलबजावणी नीट झाली नसल्याने तसेच जिल्हापरिषद आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना डावलले असल्याचा राग मनात धरून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी जोर धरत आहे.तसेच उबाठा गटाचा विद्यमान उमेदवार हा माजी जिल्हापरिषद अध्यक्ष असताना,आणि स्वतः आदिवासी असताना आपल्या आदिवासी बांधवाना न्याय देऊ न शकल्याने हा उमेदवार नको म्हणून १२ एप्रिल ला बोईसर येथील सभे अगोदर उद्धव ठाकरेंना उमेदवार बदला म्हणून आदिवासी संघटनान तर्फे पत्र देण्यात आले आहे.पण उद्धव ठाकरेंनी या विरोधा नंतरही उमेदवार बदलणार नसल्याची भूमिका घेतल्याने,त्यांना आणि पर्यायाने महाविकास आघाडीला या मतदार संघात पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.  आता पाहूयात वंचित बहुजन आघाडीचे गणित आदिवासी संघटनांनी साथ देतील आणि जिजाऊ संघटना साथ देईल या आशेवर वंचित बहुजन आघाडीने पालघर लोकसभा मतदार संघात उमेदवार उभा केला आहे.पण स्वतः जिजाऊ संघटनेने कल्पेश भावार यांना उमेदवारी दिली आहे.आणि जिजाऊची संघटनात्मक टाकत पाहता कल्पेश भावर एक सब पे भारी ठरणार असल्याची चर्चा आहे.पालघर मतदार संघात भाजपला विरोध हा खुले आम होताना दिसतो आहे.त्यात वाढवण बंदर संघर्ष समिती,आणि मुरबे बंदर,तसेच जिल्ह्यातील पेसा सारखा ज्वलंत प्रश्न आहे.म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे गट नामनिर्देशित पत्र भरायला नऊ दिवस बाकी असताना आपला युतीचा उमेदवार जाहीर करत नाही.,?त्या मुळे मुळचे पालघर जिल्ह्यातील सहा पैकी तीन आमदार असलेला पक्ष बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार जाहीर करत नाही.युतीत हा मतदार संघाला उमेदवार कोण देणार ..?भाजप कि शिवसेना शिंदे गट..?याची चाचपणी अद्याप सुद्धा सुरु आहे.त्यात विद्यमान खासदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असल्याचे समजते.गावितांच्या मुलाच्या वेळी भाजपा आणि शिवसेना जिल्हापरिषद मध्ये वेगवेगळे लढले होते.त्या वेळी विद्यमान जिल्हापरिषद उपाध्यक्ष यांनी बाजी मारली होती,आणि रोहित गावित तिसऱ्या नंबरला फेकले गेले होते.पण आता परिस्थिती बदललेली आहे.अजून नऊ दिवस बाकी आहेत..?या देशात शेवटच्या तासा पर्यंत राजकीय गणिते बदलू शकतात..?नामनिर्देशनपत्र भरायला २१६ तास बाकी आहेत,आणि परत घ्यायला ४५६ तास बाकी आहेत.या वेळेत काहीही होऊ शकते…?