पालघर | मयूर ठाकूर
पालघर लोकसभेचा नामांकन अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीमुळे पालघर चार रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाली होती. या ट्राफिक जाम मध्ये मार्ग काढत दोन ऍम्ब्युलन्स अडकल्या होत्या त्या ऍम्ब्युलन्स ला रस्ता करून देण्याचे काम बिनशर्त पाठिंबा देण्याऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी केले. स्वतः डॉक्टर असणारे उमेदवार ह्यांना आपल्या शक्ती प्रदर्शनात ऍम्ब्युलन्स अडकून पेशंटला जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जान नसणे…?
जर रॅली सोडून ऍम्ब्युलन्स ला जागा करून द्यायला डॉक्टर हेमंत सावरा उतरले असते, आणि कार्यकर्त्यांना ट्राफिक कमी करायला कामाला लावले असते तर निवडणुकीत प्रचार न करताच त्यांना विजय मिळाला असता. पण आपल्या सत्ताधारी पक्षाच्या तोऱ्यात मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांना याची जान कुठे होती…?
भाजपचे पालक मंत्री सुद्धा त्यांच्या सोबत होते, ते तर या आधीही भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयच्या उदघाट्नाला येताना डोळे बंद करून आले होते. येताना रस्त्यात त्यांना आपल्याच नगरसेविकेच्या वार्डात तुटलेल्या लोम्बकरणाऱ्या स्ट्रीट लाईट दिसल्या नव्हत्या तर या ऍम्ब्युलन्स चा सायरन तरी कसा ऐकू येणार…?
अशी अवस्था असताना कुठल्या कामाच्या जोरावर पालघर लोकसभेत कमळ फुलणार आहे…?तसेच या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात लाल रंगाचे कागदाचे तुकडे उडविण्यात आले आहेत,हा कचरा कोण साफ करणार…? रस्ता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा परीसर पूर्ण लाल रंगाच्या कागदाच्या तुकड्यांनी लाल होऊन निघाला आहे.