Palghar Nargrik

Breaking news

वैशिस्ट पूर्ण सोलर दिवा बत्ती योजनेत भ्रष्टाचार

जव्हार | मयूर ठाकूर
जव्हार नगरपरिषद हद्दीत लावण्यात आलेल्या सोलर दिवे योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भूमिपुत्र संघटने तर्फे करण्यात आला आहे. या योजने साठी लागणारी मान्यता ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा कडून घेण्यात आली असून, ज्या हायमस्त दिव्यांची किंमत ही बाजारात एक लाख पंचवीस हजारात उपलब्ध आहेत,ते दिवे नगरपरिषद कंत्राटदाराने दोन लाख पंचवीस हजारात बसविले आहेत.
अश्या प्रकारचे दीडशे दिवे नगरपरिषद हद्दीत लावण्यात आलेले आहेत.आणि लहान सोलर दिवे हे पंचवीस हजाराचे आहेत, ते साठ हजारात लावण्यात आले आहेत.जनतेचा पैसा हा कमिशन च्या नावा खाली कसा खायचा हेच या वरुण सिद्ध होत आहे. त्यात ह्या सोलर दिव्यांच्या पाच करोड रुपयांच्या कंत्राट मध्ये भाग घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील एकही कंत्राटदार नसून चारही भाग घेणारे कंत्राटदार हे नंदुरबार,धुळे या भागातील असून,स्थानिक जिल्ह्यातील कंत्राटदार एकही नाही. तसेच ज्या गणेश कॉन्टॅक्टर हे काम केले आहे, तो कंत्राटदार स्वतः येऊन इकडे काम केले नाही..?तर त्या बदल्यात स्थानिक जिल्ह्यातील कंत्राटदार पालघर येथील निलेश पाटील यांनी सब कॉन्टॅक्टर म्हणून हे काम स्वस्तात केले आहे. कुठल्याही कंत्राटदार त्याला मिळालेले कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला देऊन शकत नाही.त्या वरुण हेच लक्षात येते की या सोलर योजनेत किती भ्रष्टाचार झाला आहे.त्या बाबत जव्हार नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याशी संपर्क केला असता,त्यांच्या म्हणण्या नुसार या योजनेचे काम हे गणेश कंत्राटदार नंदुरबार यांनी केले आहे.पण प्रत्यक्ष हे काम पालघर वेवूर येथील निलेश पाटील नावाच्या उपकंत्राटदार यांनी केले आहे.तसेच निलेश पाटील हे कोणत्या लोकप्रतिनिधीच्या जवळचे आहेत,त्याचा खुलासा लवकरच करण्यात येणार आहे.असे भूमिपुत्र संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जावेद लुलानिया यांनी सांगितले.या योजनेतील कामा साठी चार ठेकेदारांनी निविदा भरलेल्या असून त्या मध्ये मे.रुद्रा इलेक्ट्रीकल्स अँड इंजिनिअर वर्क यांनी रु.४,४०,१५,४८०.००,सर्वात वरची निविदा मे.अंबिका इलेक्ट्रिकल्स अँड कॉन्टॅक्टर,धुळे.यांनी रु.४,३९,४१,७०५.००,यांनी दुसऱ्या नंबरची तर मे.भारती इलेक्ट्रिकल अँड कॉन्टॅक्टर,यांनी रु.४,३५,०७,३०५.००,यांनी तिसऱ्या नंबरची तर मे.श्री गणेश इलेक्ट्रिकल अँड कॉन्टॅक्टर यांनी सर्वात कमी दर म्हणून रु.४,३३,८०,०००.००,एवढी निविदा भरलेली आहेत.या सर्वात एकही निविदा हि स्थानिक पालघर जिल्ह्यातील नसल्याचे समोर आले आहे.तसेच ह्या निविदेची जाहिरात देताना,वृत्तपत्रानी पूर्ण जाहिरात न छापता पन्नास ते शंभर शब्दात छोटी जाहिरात छापली आहे.हे सोलर दिवे केंद्राच्या वैशिष्ट पूर्ण योजने अंतर्गत लावण्यात आले आहेत.या कामात निविदा भरणारे सर्व हे नंदुरबार धुळे येथील असल्याने विद्यामान लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचारात असू शकतो का …? हा प्रश्न निर्माण होत आहे.असे सोलर दिवे हे काही मोठ्या ग्रामपंचायत आणि नगरपंचायत,नगर पालिका या मध्ये लावण्यात आले आहेत,त्यातही मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment