Palghar Nargrik

Breaking news

गावितानी पक्ष बदलला….

पालघर | प्रतिनिधी

या वर्षी गणपती मध्ये एक मराठी गाणे प्रसिद्ध झाले होते,माझ्या पप्पानी गणपती आणला …! तसेच त्याच चालीवरील एक गाणे आज पालघर जिल्हयात ऐकण्यात आले,गावितांनी पक्ष बदलला …! गावितांनी पक्ष बदलला ..! काँग्रेस-भाजपा-शिवसेना आता पुन्हा भाजपा ..? खासदारकी गेली,आता आमदारकी साठी भाजपा..? कुठ कुठ जाणार आता..? कुठ कुठ जाणार आता..? अश्या प्रकारचे गाणे समाज माध्यमावर सकाळ पर्यंत फिरत होते.

ते आता पुन्हा बघायला गेल्यावर मिळेनासे झाले.याचा अर्थ राजकीय दबाव आणून ते गाणे हटविण्यात आले आहे.पण शिवसेनेत (पूर्वीच्या)तडजोड करूनलोकसभेचे तिकीट मिळविणाऱ्या विद्यामान खासदार गावितांना आता शिंदे आणि भाजपा यांच्या तहात ठरवून लोलीपोप देऊन तिकीट तुम्हालाच वाट पहा …? अश्या आशेवर ठेऊन उमेदवारी अर्ज भरायच्या काही तास अगोदर वारसा हक्काने माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या मुलाला उमेदवारी घोषित करून,भाजपाने आपला खरा चेहरा सर्वन समोर आणला..? भाजपच्या काही वरिष्ठ पदाधिकार्यांनी गावितांना उपरे दुसऱ्या जिल्ह्यातील म्हणून हिणवले होते..? पण त्याच गावितांना आपल्या पक्षात घेताना  राज्याच्या पदाधिकार्यान समोर हाजी हाजी करताना दिसत आहेत.गावितांचे नंदूरबारचे तिकीट काढणारे आता कुठे आहेत…? अशा प्रश्न पालघरचे जनता विचारत आहेत.

कैचीत सापडलेले निकोले

महाविकास आघाडीचा धर्म पाळावा कि मित्र म्हणून राजेश पाटीलाना मदत करायची या द्विधा मनस्थितीत डहाणूचे आमदार विनोद निकोले सापडले आहेत…? एकी कडे आदिवासी संघटना आणि जमाती यांनी भारती कामडी यांना विरोध केला असताना,आणि आता या सर्व संघटनाच्या बैठकी साठी स्वतः उद्धव ठाकरे पुन्हा पालघर दौऱ्यावर  येत आहेत अशी माहिती येत असताना,विनोद निकोले यांना मित्र राजेश पाटील कि स्वतः पाठींबा देऊन महाविकास आघाडीत उभा केलेला अकार्यक्षम उमेदवार ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपल्या कामाची कोणतीच चुणूक दाखवली नाही…?कोणाला आपली डहाणू मतदार संघातील मते देणार या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.आदिवासी ४८ संघटना आणि ४५ जमाती यांचा जिल्ह्यातील उमेदवाराला पाठींबा असताना,आणि उबाठा गटाच्या भारती कामडी यांना विरोध असताना,गावितांचा पत्ता कट झाला असे असताना.महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा हे माजी मंत्री पुत्र हिच ओळख असताना,त्यांची सामाजिक कार्याची कुठलीच माहिती भाजपा देत नसताना ४०० पैकी पालघर पण एक हे ब्रीद वाक्य कसे काय देऊ शकते…?

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन इतर मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यानंतरही बराच वेळ पालघर मतदारसंघात कोणत्याच प्रमुख पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार असतील असे बऱ्याच जणांना वाटत होते. मात्र भाजपने या जागेवर आपला दावा ठोकत हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवले. हेमंत सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे युती सरकारमध्ये आदिवासी मंत्री होते. ‘इंडिया’ अर्थात महाविकास आघाडीतर्फे भारती कामडी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केली. मात्र येथे बाहुबली समजल्या जाणाऱ्या बहुजन विकास आघाडी अर्थात बविआने अगदी शेवटच्या दिवशी आपला पत्ता उघडत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. आणि खरी लढत या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच रंगणार आहे. या तिरंगी लढतीमध्ये पालघरवासीय आपला कौल कोणाला देणार हा औस्तुक्याचा विषय आहे.

बविआला मिळाली ‘शिट्टी’

पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रबळ दावेदार बहुजन विकास आघाडीला (बविआ) पुन्हा ‘शिट्टी’ चिन्ह मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे. बविआने सर्व निवडणूक ‘शिट्टी’ या चिन्हांवरच लढवल्या होत्या. मात्र गेल्या निवडणुकीत ‘शिट्टी’ चिन्हावर एका स्थानिक पक्षाच्या माध्यमातून कब्जा करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी बविआने आपली ओळख बनलेल्या ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह वाचविण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या दिवशी राजेश पाटील यांनी अर्ज करण्यापूर्वीच ‘शिट्टी’ चिन्हाची मागणी केली होती. ‘शिट्टी’ मुळे आमचा विजय सोपा झाला.“ अशी प्रतिक्रिया बविआचे संघटक सचिव आजिव पाटील यांनी दिली.

सध्याची  स्थिती

पालघर लोकसभा मतदार संघात सुमारे 20 लाख 89 हजार 750 मतदार असून यात 10 लाख 93  हजार 967 पुरुष आणि 9 लाख 95 हजार 528 महिला मतदार आहेत. या मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती पाहता बविआचे तीन आमदार आहेत. यात वसईतून हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे राजेश पाटील यांच्या समावेश आहे. आदिवासी बहूल पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वणगा, विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील भुसारा, डहाणूत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोळे हे आमदार आहेत. नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात हिंदी भाषिक मतदार अधिक प्रमाणात आहेत.

Leave a Comment