Palghar Nargrik

Breaking news

ज्यांनी निवडून दिले त्यांनाच दलाल बोलले झेडपी अध्यक्ष…?

पालघर | प्रतिनिधी

पालघर जिल्हापरिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम हे ज्या तारापूर जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले,त्याच निवडून देणाऱ्या मतदारांना वाढवण बंदर विरोधी दलाल म्हणून संबोधले.त्या नंतर एक विदेओ प्रकाशित करून आपल्याला असे बोलायचे नव्हते असे सांगितले आहे.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर याच प्रकाश निकामानी जिल्हापरिषद कार्यालयाच्या दरवाज्या वर एक वक्तव्य केले होते.

कि मी मोखाद्यावरून येऊन तारापूर आणि किनार पट्टीच्या लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे.आज पर्यंत प्रकाश निकम यांनी तारावूर आणि किनारपट्टी च्या लोकांचा विश्वासघात केला असून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून किती योजना तारापूर साठी दिल्या…? याचे उत्तर किनारपट्टी भागातील शिवसैनिक देतील का..? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तारापूर बाह्य रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध हाताचे स्मारक उभारून अपघाताला आमंत्रण देण्याचे काम प्रकाश निकम यांनी केले आहे.त्या साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हापरिषद अभियंत्याला नोटीस देखील काढली आहे.

 

पणत्या जिल्हापरिषद अभियंत्यावर झेडपी अध्यक्ष म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करत दबाव टाकून हे स्मारक रस्त्याच्या मधोमद बांधले आहे.आणि त्या मुळे अपघात होत असल्यचे समोर आले आहे.या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला दोषी कोण…?

किनारपट्टीचा विकास करतो म्हणून सांगणारे झेडपी अध्यक्ष का..? त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणारे किनारपट्टीची आंधळी मतदार..? आम्ही कोणालाही मतदार करणार नाही आमचा पक्ष ठरलेला आम्ही एकनिष्ठ ज्यांना निवडून दिले तेच तुमच्या घरावर आले आहेत…? तुम्हाला दलाल म्हणतात..? धनुष्यातून एकदा बाण सुटल्यावर जसा परत येत नाही.तसा नंतर माझे तसे म्हणणे नव्हते चुकीचा अर्थ काढला.असे म्हणणे कितपत योग्य आहे.आता वाढवन बंदर विरोधी महायुतीच्या विरोधात बोलतील..? पण आपले विचार आपले मत मतपेटीत टाकायला बहिष्कार घालतील,त्याने होणार काय..?

 

महायुतीचा वाढवण बंदर बाजूने असलेला उमेदवार निवडून येईल…? म्हणून मतदान करा.आपले एक मत मतपरिवर्तन घडवू शकते,असे आवाहन काही उमेदवारांनी केले आहे.प्रकाश निकम मोखाड्या वरून येऊन तारापूर मध्ये निवडून येतात,तारापूर मध्ये स्थानिक उमेदवार नाही का…? हा प्रश्न आम्ही कट्टर मतदारांना विचारत आहोत.तारापूर ला जिल्हापरिषद फंडाची गरज नाही.कारण तारापूर ला अणुशक्ती केंद्राचा सी एस आर फंडच खूप आहे.या भागात ला अणुशक्ती केंद्राचा सी एस आर फंडातून मोठ्याप्रमाणात विकास कामे झाली आहेत.म्हणून कोणीही निवडून येवो आम्ही कट्टर आहोत..? पण पुढे काय…? असे बंदर विरोधींना दलाल बोलणारे परत निवडून आले तरी काय..? आम्ही कट्टर…? आता पोलीस तक्रार करून काय उपयोग राजीनामा मागा…? ते आपली चूक झाली म्हणून राजीनाम देतील काय…?हा सुद्धा पाहण्याचा विषय आहे.जसे गावितांना बाहेरून आलेले उपरे म्हणतात तसेच जव्हार आणि तारापूर हे अंतर कमी नाही.मग प्रकाश निकम तारापूर वासियान साठी उपरे नाही का …?

काही दिवसापूर्वी याच प्रकाश निकमच्या नावाने भाजपाने उमेदवारी जाहीर झाल्याचे खोटे पत्र प्रकाशित झाले होते.त्या वरून भाजपा मुंबई कार्यालयाने गुन्हा देखील दाखल केला होता.

 

Leave a Comment