Palghar Nargrik

Breaking news

आपण कोणाला निवडून देतो..? तो त्या पदावर बसण्यासाठी खरंच लायक आहे का…?

(संपादकीय ) जावेद लुलानिया

पालघर जिल्ह्यात सद्या एक तोंडातून निघालेला शब्द खूप गाजतोय..? तो शब्द म्हणजे दलाल….!आपण ज्यांना निवडून दिले, तोच आपल्याला दलाल म्हणून संबोधतो आहे…? ज्याच्यासाठी जीवाचं रान केलं त्या उपऱ्याला निवडून आणायला जंग जंग पछाडलं ,आज तोच आपल्याला वाढवणं बंदराला विरोध करतो म्हणून, “तेच बंदराला विरोध करतातं ते दलाल म्हणून संबोधतो आहे. का तर आपली एक चूक आपण कोणाला कुठे ठेवायचे तेच …? आज समाज माध्यमावर एक अजून हाक येते आहे..? भाजपा आणि बहुजन विकास आघाडी एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत…? मग मन विचारकरू लागते हे खरं आहे का…? मग आठवतो कोविड चा तो काळ जेव्हा स्थानिक मरत होता, तेव्हा कोण होत..? कोण होत मदतीला, होते ते फक्त समाज सेवक …? तेव्हा मी या पक्षाचा सैनिक मी किवां या पक्षाचा कार्यकर्ता असे कोण नव्हतं…? त्या काळी होती फक्त माणूसकी म्हणून आज प्रचार कोण कितीही करो, पण कोविड काळा मध्ये माझ्या मदतीला कोण धावून आले होते…? तो ज्या उमेदवारांन सोबत तोच माझा उमेदवार…?

 ज्या काळात भाऊ भावाला विचारत नव्हता त्या काळात जो धावून आला तो ज्याच्या सोबत त्यालाच माझं मत असा मतदार विभागला गेलेला आहे. त्या मुळे आता कोणत्या पार्टी सोबत कितीही कोणीही असो..? मतदान तो ज्यांनी मदत केली त्यालाच करणार आहे.ही तर काळ्या दगडावरची रेष आहे.आज पालघर लोकसभे साठी महत्वाचा मुद्दा आहे, स्थानिक वाढवण बंदर,पेसा भरती, हे येथिल स्थानिकांशी अत्यंत निगडित मुद्दे आहेत.या मुद्द्यानवर निवडणुकीत सर्वात जास्त निवडणूक लढवली जाणार आहे. पण त्यातील पालघर लोकसभेतील उत्तन ते झाई या किनारपट्टी भागातील आत्मीयतेचा मुद्दा असलेल्या वाढवण बंदर पण त्याच वाढवण बंदर विरोधी भूमिका घेणार्यांना दलाल म्हणून विद्यमान जिल्हापरिषद अध्यक्ष संबोधतो, ज्याला तारापूर सारख्या किनारपट्टी भागाने बाहेरून आणून निवडून दिला तोच हे वाक्य बोलतोय..? आणि राहिली बहुजन विकास आघाडी ज्यांच्या नेत्यांनी कधी वाढवण बंदराचा वा तरी काढला नाही…? ते म्हणतात आमचा विरोध पहिल्यापासून आहे. पण तो विरोध कधी विधानसभेत दिसून आला नाही…? पालघरमतदार संघ निर्माण झाल्यावर पहिली लोकसभा बहुजन विकास आघाडी कडे होती, पण केंद्रा तुन पालघर ग्रामीण आदिवासी भागासाठी काही आणताना बहुजन विकास आघाडी दिसली नाही. म्हणूनच बहुजन विकास आघाडी कडे मतदारांची नाराजी आहे. असे दिसून येत आहे. सुरुवातीला जिला जिच्याच पक्षातून विरोध होता त्या संघर्ष कन्येला आता प्रचारात सामान्य नाराज मतदारांचे मत मोठ्या प्रमाणावर पडतील असे दिसत आहे. काल एका मोठ्या दैनिकांचे निवासी संपादक आणि आमच्या मित्राशी या पालघर लोकसभे उमेदवार आणि निवडणूक विषयवर गप्पा मारण्याचा योग आला, त्या मित्रानी तर आपले स्पष्ट मत सांगितले जीला उमेदवारी मिळाली म्हणून नाराज असलेले पक्ष पदाधिकारी जोमाने प्रचाराच्या कामाला लागले आहेत.त्यात पक्ष नेतृत्वाने ही उमेदवार निवडून आली पाहिजे म्हणून आदेश दिला आहे. म्हणून विरोध सोडून पक्ष पदाधिकारी कामाला लागले आहेत.महाविकास आघाडी सर्व पक्ष मतभेद विसरून एक झाले आहेत.त्यात महायुतीत सर्व आलबेल असल्या सारखं दिसत असले तरी सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. गावितांना तिकीट मिळाले नसल्याने ते नाराज आहेत, पण फडणवीसांनी राज्यात मंत्री पदाची ऑफर दिल्याने ते सोबत आहेत.पण दुसरे पाठिंबा देणारे कार्यकर्ते पदाधिकारी मात्र नाराज दिसत आहेत.हा डॉक्टर कधी आमचा फोन घेतो..? आमच्या कधी कामाला आला आहे. पक्षात असून सुद्धा कोविड मध्ये फोन करून कामाला आला नाही. फक्त मोदीजी वरील आणि पक्षावरील श्रद्धे साठी कार्यकर्ते म्हणून काम करायचं असे काही कार्यकर्ते खाजगीत म्हणताना दिसत आहेत.अश्यात उमेदवार कितीही चरित्रवान असो निवडून कसा येईल. ज्या भाजपच्या पालघर जिल्हा अध्यक्षानी गावितांच्या उमेदवारीला विरोध केला, त्याच जिल्हा अध्यक्षांची काही वर्षा पूर्वी वृत्तपत्रात बातमी  आली होती, ” डहाणू जनता बँकेचा आरोपी, राज्यमंत्री गावितांच्या दरबारात “अश्या आश्रयची बातमी एका दैनिकात छापण्यात आली होती. आणि फोटो होता,विद्यमान भाजपा जिल्हा अध्यक्ष आणि तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र गावितांनचा…? मतदार किती लवकर विसरतात…?लोकसभेवर आपण खासदार का निवडून पाठवतो..? केंद्रातील योजना आपल्या भागात आणायला पण तसे होताना आज पर्यंत दिसले नाही…?सर्वात मोठा प्रश्न स्थानिक तरुणांना रोजगार आहा आहे.पासपोर्ट कार्यालय वसई येथे सुरु झाले,अजूनही वसई ला पासपोर्ट साठी जव्हार मोखाडा भागातील नागरिकांनी कसे जावे..? असा प्रश्न आहे.अजूनही तेथे कमीत कमी प्रमाणात काम होते.ते मोठ्याप्रमाणात कसे होईल…? असे प्रश्न आहेत.तसेच पाकिस्तानात अडकलेले या मतदार संघातील मच्छिमार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार…? ठाणे ते घोडबंदर-मीरा भाईंदर ते वसई विरार अशी रो-रो सेवा सुरू झाली.पण ती सेवाही रडत रडत सुरु आहे.डहाणू चर्चगेट लोकल चे विस्थार व्हावा, टेंभी खोडावे (पालघर) ते मरंबळपाडा (विरार) सागरीसेतू मार्गाला पालघर-विरार सागरी सेतू मार्गाने कधी जोडणार..?, केळवे शिरगाव, चिंचणी, डहाणू, बोर्डी बीच, जव्हार इ. पर्यटन क्षेत्र विकास करिता केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांच्या कडे पाठपुरावा करणे,पालघर जिल्ह्यातील ताडी-माडी उत्पादन व विक्री संस्थाच्या मागण्या शासन स्तरावर मांडून सवलत आणणे,तसेच डहाणू-जव्हार प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी काम करणे,जिल्हयात अद्यावत रुग्णालय निर्माण करणे, महामार्गावरील समस्यांचे निवारण करणे,अशी कामे लोकसभा सदस्य खासदाराच्या अखत्यारीत येतात,या कामाचे आश्वासन सध्याचा कुठलाच उमेदवार देताना दिसत नाही.मग मतदारांनी निवडून द्यावे कोणाला ..? आशिया खंडातील सर्वात मोठा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची  निर्मिती केली म्हणून पालघर जिल्ह्याचे शिल्पकार निर्माते  म्हणून राजेंद्र गावित ह्यांची ख्याती मिरवत आहेत.पण त्याच पालघर जिल्हयात आशिया खंडातील सर्वात मोठी अशी तारापूर औद्योगिक वसाहत सुद्धा आहे.त्याच्याही खूप मोठ्या समस्या केंद्रातून सोडविण्यात येतात,त्या कडे फक्त निवडणूक फंडा साठी सर्व उमेदवार प्रतिनिधी जातात,पण त्यांच्या समस्यांचे काय…? हे कोणी जाणून घेतले.तिथे स्थानिकांना रोजगार मिळतो का..? कि मुळचा या जिल्ह्यातील असलेला आदिवासी बांधव अजून किती वर्षे स्थलांतरित आयुष्य जगणार आहे…? तसेच किमान वेतन आणि कायमस्वरूपी नोकरी हा हि एक प्रश्न आहे…?तो प्रश्न हि केंद्रातून सुटणार आहे.त्या साठी आवाज सुद्धा मतदार संघासाठी खासदाराने उठवायचा असतो.पण हे मुद्दे घेऊन एकही उमेदवार आपल्या तोंडातून शब्द काढायला तयार नाही.आदिवासी महिलांनसाठी असलेली केंद्रातून आलेली जलजीवन मिशन सारख्या योजना ह्या फक्त कंत्राटदार यांच्या किजोऱ्या भरण्यासाठी वापरायच्या का..? हजारो करोडो रुपये या सारख्या योजनावर खर्च होतात,पण तरीही आज माझी आदिवासी भगिनी घोटभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे.आणि जिल्हयात निवडणुका कश्यावर लढवल्या जातात तर साधू हत्याकांड…? पण त्याच गडचिंचले मध्ये तिथल्या मतदारांची काय अवस्था आहे.त्यांच्या काय समस्या आहेत ते कोणी उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी तिथे पहावयाला गेला आहे का…? माणसाची एक चूक त्याची कायमचा मोठा गुन्हा मानली जाते.

आताच काही वेळे पूर्वी भाजपा उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे सेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदरा विषयी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे असे घोषित केले.म्हणजे तुमच्या मतांवर आल्यावर ते आमचे नाहीत.असे बोलणे, तो पर्यंत आमचा घटक पक्ष ..? आता वाढवण बंदरा विषयी संसदेत बोलताना तिथला माझा मतदार नाही…? त्याच्या समस्या माझ्या मतदारांच्या नाहीत का..? म्हणून तुम्ही त्यांचे प्रश्न मांडणार नाहीत का..? तुम्हाला का निवडून द्यावे याचे उत्तर प्रत्येक उमेदवारा कडून मतदारांना या निवडणुकीच्या प्रचारात मिळेल का..?

Leave a Comment