Palghar Nargrik

Breaking news

तुमच्या एका मताने पुन्हा पालघर मध्ये बदल घडणार –आ. राजेश पाटील

वसई | प्रतिनिधी

पालघर लोकसभेवर पहिला झेंडा हा बहुजन विकास आघाडीने लावला होता. आता येणाऱ्या निवडणुकीत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले आहे. राजेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडी हा घरचा पक्ष असून दिल्ली मुंबई येथून आदेश येऊन काम करण्याची वाट पाहावी लागणार नसून मतदारांचे काम म्हणजे माझ्या साठी आदेश असणार आहे. आपल्या पक्षात धर्म जात याच्या पेक्षा नागरिकांच्या कामाला महत्व दिले जात असते.


पालघर जिल्ह्यातील सहा पैकी तीन आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीला हरविण्या साठी राष्ट्रीय नेते पालघर येत आहेत. राज्य स्थरीय नेते तर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले असले तरी जिल्ह्यातील स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीने आपला निवडणुकीतील सहभाग स्पष्ट केलेला असून पहिला अर्ज भरण्याचा मान देखिल पटकवला आहे.

 

त्या मुळे बहुजन विकास आघाडीने आपन लोकसभा निवडणुज पूर्ण ताकतीनिशी लढणार हे आदीच स्पष्ट केले होते.बहुजन विकास आघाडीचे पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेले दिसत आहेत.

Leave a Comment