Palghar Nargrik

Breaking news

माजी पोलिस अधिकाऱ्याची डॉक्टर कडून फसवणूक

पालघर | जावेद लुलानिया
पालघर येथिल वैशाली नर्सिंग होम चालवणारे डॉ. श्रीकांत बुद्धे यांच्यावर माजी पोलिस अधिकारी आय एस पाटील यांना आणि त्यांच्या मित्र परिवार यांचा वर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तील हकीकत अशी की, अभयसिंह घोरपडे यांनी पालघर चार रस्ता येथिल सर्वे नं.३५/१पै. ही जमीन विनायक घरत इतर यांच्या कडून विकत घेतली. त्या जागेवर असलेल्या पेट्रोल पंपावर डॉ. श्रीकांत बुद्ध हे वेळ घालवण्यासाठी बसत होते. त्यांनी दिनांक १४ मार्च रोजी अभयसिंह घोरपडे यांच्या मोबाईल वर व्हाट्सअप वर फोटो पाठवला त्या फोटो मधिल असलेल्या स्टॅम्प पेपर मधिल वरील असलेल्या साठेकरार मध्ये अभय सिंह यांच्या नावात सुद्धा बदल असून त्यांची सहीही खोटी असल्याचे लक्षात आले. तसेच डॉ.बुद्ध हे नेहमी असेच बदनामी करीत असून ब्लॅकमेल करतात. म्हणून आय एस पाटील यांच्या तर्फे अभयसिहं घोरपडे यांनी पोलिस ठाण्यात २२ मे २०२४ रोजी तक्रार दाखल केली आहे.तसेच आय एस पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.बुद्धे यांनी माझी आणि माझ्या मित्र परिवाराची बदनामी करीत आहेत अशी माहिती दिली.

Leave a Comment