Palghar Nargrik

Breaking news

काँक्रेट मिक्सर मधिल माल रस्त्यावर पडल्याने अपघाताल आमंत्रण

पालघर | मयूर ठाकूर


पालघर जिल्ह्यात सध्या विकासाला गती आली असून बुलेट ट्रेन मुंबई बरोडा कॉरिडोर आणि इमारत बांधकाम सारखी विकास कामे होताना दिसत आहेत.ज्या साठी सिमेंट काँक्रेट चा रेडीमिक्स माल त्या ठिकाणी नेण्यासाठी रेडिमिक्स मिक्सर चा वापर केला जातो.

हा मिक्सर क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात भरलेला असतो तो वळण मार्गांवर,घाटात,उतार, चढण मार्गांवर, त्यातील सिमेंट आणि खडी मिश्रित माल रस्त्यावरील पडलेला असतो,त्या मुळे मोटर सायकल चालकांचा अपघात होण्याची शक्यता असते. तसेच हयावा चालकही आपल्याला गाड्या ओव्हरलोड भरतात, त्यांच्या गाडीतून सुद्धा खडी आणि क्रश सॅन्ड खाली रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.

या ओव्हरलोड गाड्यावर कारवाई करण्याचे काम परिवहन विभागाचे आहे. पण जिल्ह्याला लाभलेला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आपली आर्थिक घेवानीत एवढा मस्तावला आहे की, त्याला कोणी मरो किंवा जगो, त्याला अपना काम बनता भाड मे जाये जनता..? अश्या अवस्थेत आहे.परिवहन अधिकाऱ्यांच्या गाड्या जिल्हयात फिरतात पण त्यांना ओवर लोड गाड्या दिसत नाहीत.ते डोळे बंद करून ठेवतात.

 

हा अधिकारी कधी कोणी बघितला का अशी बातमी आम्ही आधीही प्रकाशित केली होती. अश्या मस्तवाल अधिकाऱ्यांन मुळे आरटीओ प्रशासन बदनाम झाले आहे. अश्या दशरथ वाघुले सारख्या अधिकाऱ्यांना या जिल्ह्यातून बदली तरी करा किंवा बडतर्फ तरी करा.

या रस्त्यावर माल टाकणाऱ्या ओव्हरलोड गाड्यावर सातदिवसात कारवाई नाही झाल्यास भूमिपुत्र संघटना स्वतः रस्त्यावरील उतरून रस्ता जाम करणार आहे अशी भूमिका भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी घेतली आहे.

Leave a Comment