पालघर | जावेद लुलानिया
पालघर जिल्हयात सध्या राजकीय घडामोडी मोठ्याप्रमाणावर होताना दिसत आहेत,त्याचाच एक भाग राहिलेल्या आणि एकनाथ शिंदे यांचे कट्टर म्हणून मिरवणाऱ्या विश्वास फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी आज शिंदेंची साथ सोडून शिवसेना उबठा गटात प्रवेश केला आहे.
आपल्या राजकीय भविष्यासाठी हि उडी मारल्याचे बोलले जात आहे.मुळचे नंदूरबार चे असलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना पालघर कर जनतेने स्वीकारले…? ह्याच धर्तीवर आपली पण राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्देश्याने पालघर मध्ये समाजसेवक म्हणून स्वतःच स्वतःला लॉन्च करणारे मुळचे त्वचारोग तज्ञ असलेले डॉक्टर विश्वास वळवी त्यांनी एकनाथ शिंदे गुरु मानून मांडलिकत्व स्वीकारले होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपले गुरु पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी न मिळाल्यामुळे आपली सुद्धा राजकीय गैरसोय होते का काय..? म्हणून विधानसभा निवडणूकीची घोषणा होण्याअगोदर आपली संभाव्य राजकीय उमेदवारी मिळविण्यासाठी उबठा गटात गेले असावेत.
शिंदे गटात पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित हे आपला पूर्वीचा पालघर विधानसभा मतदार संघ इतर कोणाल सोडणार नाहीत आणि एकनाथ शिंदे आणि भाजप सुद्धा त्यांचे पुनर्वसन पालघर किवां बोईसर मतदार संघात उमेदवारी देऊन करणार असे लक्षात आल्यावर,तसेच पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे पुढील निवडणुकीत डहाणू विधान सभे साठी इशच्छुक असल्याचे बोलले जात असल्याने आणि पालघर विधानसभे साठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या स्थानिक असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढान यांच्या पुढे आपले काही चालणार नसल्याने, विधानसभा उमेदवारी साठी आताच तयारी म्हणून आणि राजकीय भविष्यासाठी विश्वास वळवी हे उबठा गटात गेल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीची मतांची गणिते पाहता,या वेळी आपले राजकीय पुनर्वसन ठाकरेंकडून नक्कीच होणार…? याची बेरीज करून मगच वळवीनी आपला जाहीर प्रवेश केला असेल.या प्रवेशाच्या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा उबठा गटाच्या लोकसभा उमेदवार भारती कामडी,जिल्हा प्रमुख विकास मोरे हे दिसत आहेत.भारती कामडी या लोकसभा निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या कमजोर पडल्यामुळे निवडणूक हरल्याचे बोलले जात होते.पण आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम हे डॉ.विश्वास वळवी करतील असे बोलले जात आहे.म्हणून त्यांच्या मार्फतच हा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे…?