Palghar Nargrik

Breaking news

वसई विरार शहर महानगरपालिकेची अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई

 

                        मा.आयुक्त यांचे आदेशानुसार व मा.अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा.उप-आयुक्त श्रीमती विशाखा मोटघरे यांच्या उपस्थितीत वसई विरार शहर महानगरपालिका जाहिरात विभागा मार्फत महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली.
दिनांक २७/०६/२०२४ प्रभाग समिती ‘डी’ अंतर्गत वसई पूर्व येथील चिमाजी आप्पा स्मारक जवळील एकूण तीन (३) जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली ज्याचे क्षेत्रफळ २०X२०, २०X२०, १५X१५ असे आहे. तसेच प्रभाग समिती ‘एच’ अंतर्गत वसई पश्चिमेकडील पंचवटी व स्टेला परिसर येथे एकूण तीन (३) जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. ज्याचे क्षेत्रफळ १५X२०, १५X२०, १५X२० असे असून प्रभाग समिती ‘डी’ व ‘एच’ अंतर्गत सहा (६) जाहिरात फलकांवर दि.२७/०६/२०२४ रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे दिनांक २८/०६/२०२४ प्रभाग समिती ‘डी’ अंतर्गत चिमाजी आप्पा स्मारक जवळील २०X२०, २०X२०, १५X२० क्षेत्रफळाच्या एकूण तीन (३) जाहिरात फलकावर कारवाई करण्यात आली तसेच प्रभाग समिती ‘एच’ अंतर्गत माणिकपूर नाका हनुमान मंदिर स्टेला परिसर येथील चार जाहिरात फलकावर कारवाई करण्यात आली ज्याचे क्षेत्रफळ २० X १०, २० X २०, २० X १०, २० X २० असे असून प्रभाग समिती ‘डी’ व ‘एच’ अंतर्गत सात (७) जाहिरात फलकावर दिनांक २८/०६/ २०२४ रोजी कारवाई करण्यात आली.
तसेच दिनांक २९/०६/२०२४ रोजी प्रभाग समिती आय अंतर्गत सागर शेठ पेट्रोल पंप समोरील दोन (२) जाहिरात फलकावर कारवाई करण्यात आली ज्याचे क्षेत्रफळ १५ X २०, १५ X २० इतके आहे.
दिनांक ०२/०७/२०२४ रोजी प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत बापाणे फाटा येथील दोन (२) जाहिरात फलकावर कारवाई करण्यात आली ज्याचे क्षेत्रफळ ४० X २०, ४० X २० इतके आहे.
अशाप्रकारे दिनांक २७/०६/२०२४ ते दिनांक ०२/०७/२०२४ या कालावधीत महानगरपालिका जाहिरात विभागामार्फत एकूण १७ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात असून यापुढेही हि कारवाई अशीच सुरु राहणार आहे.

जाहिरात विभाग, मुख्यालय
वसई विरार शहर महानगरपालिका

Leave a Comment