Palghar Nargrik

Breaking news

पालघर. मनोर डोकं ठेचलेलं, स्कार्फ, छत्री आणि चपला विखुरलेल्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महिलेचा अर्धनग्न मृतदेह

एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नजीक आढळून आला आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नसून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे. महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात मार्गिकेवर उड्डाणपूलालगत असलेल्या सर्व्हिस रोडनजीक एका गॅरेजच्या पाठीमागच्या बाजूस एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मनोर पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला असून मृतदेहाचे वय अंदाजे ३५ ते ४०च्या दरम्यान आहे. मृत महिलेचं डोकं दगडाने ठेचण्यात आले असून कमरेखालील भाग नग्न अवस्थेत असल्याचे आढळून आले. महिलेच्या मृत्यूबाबत दातपाताचा संशय असल्याने घटनास्थळी तपासासाठी पोलीस मुख्यालयातील डॉग स्क्वॉडला देखील पाचारण करण्यात आले. घटनास्थळालगतच्या परिसरातून मृत महिलेचा स्कार्फ, छत्री आणि चपला पोलिसांना घटनास्थळाचा तपास करताना आढळून आल्या असून या सर्व बाबी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेचं डोकं दगडाने ठेचण्यात आल्याने व मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने महिलेवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणी अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment