रोटरी क्लब ऑफ पालघर आणि इनरव्हील क्लब ऑफ पालघर व यश फॉउंडेशन यांचा सयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित केलेल्या मॉन्सून सायकल रॅलीमध्ये पालघर मधील अकरा शाळांमधून २७० पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यश फाउंडेशन आणि R5 फौंडेशन चे श्री कृपाल रावत यांच्या तर्फे विजेत्यांना सायकली आणि ट्रॉफीज देण्यात आल्या. सर्व स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक चाणक्य फाउंडेशन तर्फे टी-शर्ट देण्यात आले अमर बाजपेई व शिल्पा बाजपेई तर्फे स्मार्ट वॉच व ear pods देण्यात आले तसेच
मुलांमध्ये प्रथम क्रमांक साईनाथ मिश्रा, सुशांत सांगळे, तर मुलींमध्ये तनुश्री गराड आणि कस्तुरी शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या सायकल रॅलीला यश फाउंडेशनचे प्रमुख उत्तम पिंपळे व सौ दीपा पिंपळे आणि चाणक्य फाउंडेशनचे प्रमुख संदीप तिवारी यांनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला.
विद्यार्थ्यांमध्ये आणि जनमानसांमध्ये समाजाप्रती आदर आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याकामी उपस्थितांकडुन शपथ वदवून घेण्यात आली.
या सायकल रॅलीला पालघर पोलीस dysp श्री अभिजीत धाराशिवकर आणि पालघर पोलीस निरीक्षक श्री अनंत पराड सर आवर्जुन उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण पाटील, सचिव रफिक धडा, कार्यक्रमाचे प्रमुख अमित राजपुरोहित, इनरव्हील क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षा प्रीती पाटील, सचिव विनिता पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पा बाजपेयी उपस्थित आणि रोटरी आणि इनरव्हीनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीच्या उत्तम नियोजनासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि चाफेकर college चेNCC आणि NSS च्या विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलला.