पालघर | जावेद लुलानिया
डहाणू शहरातील अय्याज संजनिया या रिक्षा चालकास दोन वर्षा पूर्वी मोडलेले लग्न, डोक्यात ठेऊन मिर्ची पूड डोळ्यात टाकून, कोयत्याने वार करून मारहाण करण्यात आलेली असून, तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाला असल्याचे बोलले जात आहे.शाबाज पिरजादा असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याचे बोलले जात असून.आरोपीला राजकीय वरद हस्त असल्याने पोलिस आरोपीला अटक करत नसल्याचे बोलले जात आहे. शाबाज पिरजादा याचे चारोटी येथिल एका तरुणी सोबत लग्न जमले होते, त्या तरुणीची बहिणीची आणि अय्याज यांची मैत्री असल्याने, आपले लग्न मोडले, ह्याचा राग मनात ठेऊन हा हल्ला झाल्याचे नोंदीत तक्रारी मध्ये म्हंटले आहे.आर्थिक देवाण घेवाण करून आरोपीला अटक न करता दानू पोलिस आरोपीला पाठीशी घालून, अटक पुर्व जामीन घेण्यासाठी मुभा देत असल्याचे बोलले जात आहे.याची दखल वरिष्ठ पोलिस अधिकारी घेतील का…?की प्रधानमंत्री दौरा असल्याचे सोपे कारण पुढे करतील हे पाहणे गरजेचे आहे. आरोपीला अटक न करता, जामीन घेण्यासाठी मुभा देने, हा सुद्धा एक सामाजिक अपराधच आहे.