Palghar Nargrik

Breaking news

भ्रष्टाचारात लुटला पालघर जिल्हा…? सहा विधानसभा मतदार संघांचा लेखा जोखा..

बोईसर विधानसभा (मयूर ठाकूर)

बोईसर विधानसभा हा मतदारसंघ बोईसर पास्थळ पासून मनोर मार्गे वसई पुर्व पासून ते तिल्हेर-शिरवली पर्यंत पसरलेला आहे. या विधानसभा मतदार संघ निर्माण झाल्या पासून बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व पंधरा वर्षा पासून कायम आहे.आधी दोनवेळा बहुजन विकास आघाडीचे विलास तरे हे आमदार होते. गेल्या वेळी विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीतून बंडखोरी करून शिवसेनेतून उमेदवारी घेतली होती, पण बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या या मतदार संघावरील पकड कायम राखत राजेश पाटील यांच्या रूपाने निसतात विजय मिळवळा होता.ह्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते,बोईसर मतदार संघाचा विचार करता, लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची मते घटल्याचे दिसून आले.पण आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हे राजेश पाटीलच असतील असे सांगितलं जाते. भाजप तर्फे गेल्या वेळी छुपा पाठिंबा घेऊन संतोष जनाठे हे अपक्ष उभे होते.त्यांच्या मुळे विलास तरे हे हरल्याचे बोलले जात होते. पण या वेळी परिस्थिती वेगळी आहे.शिवसेनेचे दोन गट पडले असून, उबाठा, आणि शिंदे गटाचे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असून, युतीत भाजप शिवसेना शिंदे गट यांच्यात रस्सी खेच सुरु आहे. भाजप मध्येही माजी आमदार विलास तरे, आणि पूर्वा श्रमिचे भाजप कार्यकर्ते संतोष जनाठे हे गुढघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर शिंदे गटा कडून जगदीश धोडी हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत.तर उबाठा गटातून दुसऱ्या जिल्ह्यातून राजेंद्र गावितांन सारखे आयात केलेले विश्वास वळवी हे सुद्धा तयार आहेत.तर जिजाऊ संघटना ही या मतदार संघावर आपला उमेदवार देऊन दावा करू शकते. जिजाऊ कडे बोईसर येथिल स्थानिक उमेदवार नरेश धोडी यांचाही चांगलाच सामाजिक संपर्क स्थापित झाला आहे. त्या मुळे जिजाऊ या बोईसर विधानसभा मतदार संघात आपला उमेदवार देऊ शकते.काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे दोन्ही गट यांचे मतदार संघात संभाव्य उमेदवार अजून तरी कोणी नाहीत.आता पाहणे हेच आहे की, कोणाला पक्षाचे तिकीट (उमेदवारी )मिळणार…? आणि कोण बंडखोरी करणार…? बोईसर विधानसभा मतदार संघाला गेल्या टर्म पासून बंडखोरीची कीड लागली आहे. त्यात युती आणि आघाडीतील सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी आपण कसे निवडून येऊ शकतो, म्हणून निवडणुकीच्या तीन महिने आधी दहीहंडी निमित्त शक्ती प्रदर्शन करून पाहिले आहे.बोईसर विधानसभा मतदार संघात विद्यमान सदस्य असलेले बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे आपल्या कामा मुळे ओळखले जातात,त्यांच्या मतदार संघात जनसंपर्क दांडगा असल्याने आणि ऐन वेळेला अनेक संभाव्य उमेदवार उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणार असल्याचे चिन्ह निर्माण झाल्याने कोणता पक्ष बोईसर चा गड सर करतो..? ते पाहणे गरजेचे आहे.मतदार राजा कोणाला कौल देतो…?हे सुद्धा पहावे लागणार आहे.तसेच हा गड बहुजन विकास आघाडी चौथ्यानदा राखते का…? हे पाहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभेचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान आमदार यांनी केलेली कामे यांचा लेखा जोखा प्रत्येक भागात पाहुयात.कोणी किती कामं केली..? आणि मतदारांचे त्यांच्या विषयी असलेले मत….!

Leave a Comment