पालघर | प्रतिनिधी
संघर्ष संघटने तर्फे गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन यांचा जन्म दिवस अर्थात शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सफाळे येथिल देवभूमी सभागृहात हा शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक, आणि अंगणवाडी सेविका यांचा देखिल या वेळी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या वेळी आमदार राजेश पाटील, सफाळे (उंबरपाडा) च्या सरपंच तनुजा कवळी, पंचायत समिती सदस्य रुपेश धांगडा, कामिनी पाटील, पॅन्थर संघटनेचे संतोष कांबळे, महिला बाल कल्याण अधिकारी गौरी धांगडा, संघर्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते