Palghar Nargrik

Breaking news

वाडा येथे कुस्ती प्रदर्शन…

आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी , अस्पी विद्यालय उचाट, ता. वाडा, जि. पालघर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये वाय.वाय. सी. इंग्लिश स्कूल कुडूस शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय दैदिप्यमान कामगिरी करत आपल्या मेहनतीच्या , कौशल्याच्या आणी शाळेच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर तब्बल 14 गोल्ड मेडल आणी 07 सिल्वर मेडल जिंकले आहेत.

या स्पर्धेमध्ये पालघर जिल्हातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अमृत घाडगे,
आणि जिल्हा क्रीडा मार्गदर्शक श्री. प्रीतीश पाटील , वाडा तालुका क्रीडा अधिकारी श्री. प्रशांत पारगावकर, तलासरी तालुका क्रीडा अधिकारी श्री. मारुती थोरात , अस्पी हायस्कूल उचाट चे प्राचार्य श्री . अनिल भोईर आणि वा य वाय सी इंग्लिश स्कूल कूडूस चे चेअरमन श्री. मिलिंद चौधरी हे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
पालक आणि नागरिकांकडून विजयी खेळाडू आणि वाय वाय सी स्कूल चे क्रीडा प्रशिक्षक श्री. संभाजी घोडविंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे…
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


गोल्ड मेडल मिळवणारे आमचे खेळाडू विद्यार्थी
गट – Under 14

1) आयुषी पाल
2) राणी शर्मा
3) प्रिया सिंग
4) राधा यादव
5) स्वाती गोंड
6) राधिका यादव
7) सुंदरम तिवारी
8) अनिकेत यादव
9) चेतन गुंजाळ
गट – Under 17
1) सनी सिंग
2)खुशबू मिश्रा
3) भक्ती चौधरी
4) ईकरा शेख
5) तन्वी पाटील
सिल्वर मेडल मिळवणारे आमचे खेळाडू विद्यार्थी 🏅

गट – Under 14
1) अर्णव पाटील
गट – Under 17
1) विकास कनोजिया
2) शुभम बेलकर
3) पवन शर्मा
4) हार्दिक पाटील
5) सानिया थोरात
6) सेजल सिंग
कृपया आपण आमच्या विद्यार्थ्यांची बातमी आपल्या वृत्तपत्रामध्ये द्यावी ही नम्र विनंती..
प्रिन्सिपल
सौ. अर्चना मेने
वाय वाय सी इंग्लिश स्कूल
कुडूस

Leave a Comment