पालघर | जावेद लुलानिया
पालघर चे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात नशा मुक्ती अभियानाला सुरुवात केली खरी, पण आज गांधीनगर येथिल स्थानिक रहिवाशी्यांनी पालघर पोलिस ठाणे येथे भेट देऊन, गांधीनगर मध्ये सध्या सुरु असलेल्या नशेच्या धंद्या ला तात्काळ बंद करा असे निवेदन दिले.एस पी साहेबांनी नशा मुक्त पालघर जिल्हा ची हाक दिली होती, त्या हाकेला पालघर गांधीनगर च्या स्थानिक रहिवासीयांनी साथ देऊन, आज पोलिस ठाणे पालघर येथे सर्व नागरिकांनी येऊन, नशेचा हा धंदा तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.