पालघर | मयूर ठाकूर
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर भाजपचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण दिड महिना भराच्या अंतराने पुन्हा ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी १२ ते ३ या वेळेत जनता दरबार घेण्याचा देखावा करणार असल्याचे समजत आहे.गेल्या वेळी १६ ऑगस्ट रोजी असाच देखावा त्यांनी केला असल्याचा अनुभव जनता दरबारात आपली कामे आणि तक्रारी यांचे निवारण होईल ही आस लावून गेलेल्या जनतेला त्या जनता दरबाराचा अनुभव वाईट होता.
या वेळी सुद्धा तोच अनुभव जनतेला नक्की येईल असा सुरु नागरिकां मधून ऐकावंयास मिळत आहे. रविंद्र चव्हाण यांना जिल्ह्यात त्यांच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या व्यतिरिक्त काहीही दिसत नाही. हा सामन्या जनतेचा अनुभव आहे.उदाहरणार्थ गेल्या वर्षी भाजपा शहर अध्यक्ष यांच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी येत असताना त्यांना लटकणारे दिवाबत्ती च्या खांबावरील फोकस दिसलें नाहीत.त्या वेळीही ते ढोल ताशा वाजवत आले होते.
पण त्यांना करदात्या सामन्य जनतेच्या सुविधा या कडे आपले नगरसेवक देत नाहीत ते दिसलें नाही. या वेळीही गेल्या वेळ सारखीच देखावाचा जनता दरबार भरवून आमचा पक्ष किती कामे करतो हे दाखवून देण्यासाठी भरवला आहे का…? हा प्रश्न सामन्य जनता विचारत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गवरील गुजरातच्या कंत्राटदारा मुळे सामन्य प्रवासी त्रस्त असताना, जनता दरबारात महामार्गा बाबत तक्रार आलेली असताना, पत्रकार परिषदेत पत्रकारां समोर तक्रार आली नाही असे खोटे बोलणाऱ्या पालक मंत्र्या वर कोण विश्वास ठेवेल…? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, पालक मंत्री म्हणून हा जनता दरबार भरवला जात आहे.अशी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांन मध्ये सुद्धा दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे…? आता दोन महिन्यात निवडणुकीची आचार संहिता लागेल,त्या आधी सगळी विकास कामांची भूमिपूजन उरकून, त्याच्या जाहिराती करायच्या असल्याने भाजपचे मंत्री महोदय जनता दरबाराचा घाट घालत आहे….? त्यातच लोकसभा निवडणुकीच्या वेळी अकार्यश्रम खासदार निवडून आल्याचेही बोलले जात आहे. महामार्गांवर जनता ट्राफिक मुळे त्रस्त असताना,रुग्णवाहिकेत रुग्ण दगवत असताना, डॉक्टर असलेल्या भाजपाचे खासदार काय कामाचे…? पालकमंत्री विधानसभेसाठी जनता दरबार भरवत असून आता, जिल्ह्याला अकार्यश्रम आमदार मिळणार का…? पालक मंत्री रविंद्र चव्हाण हे नेहमी आपल्या शर्टला भाजपचे कमळाचे चिन्ह लावून असतात, म्हणून त्यांना जिल्ह्यात भाजप चे पालकमंत्री म्हणून संबोधन्यात येत आहे.