Palghar Nargrik

Breaking news

व्यवसाईक बॅनरचा भार पी डब्लू डी च्या रस्त्यावर आणि नगरपरिषदेच्या खांबावर…?

पालघर | प्रतिनिधी

पालघर नगरपरिषद च्या हद्दीत स.तू.कदम पालघर बोईसर रोड वर नेहमीच वाहतूक कोंडी असते आता, त्यात भर म्हणून आनंद आश्रम शाळेसमोर आता एका बॅनर व्यवसायिकाने त्याचे बॅनर चे दुकान रस्त्यावर सुरु केले असून, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर, किंवा पालघर वाहतूक पोलिस यांची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.पालक मंत्र्यांच्या जनता दरबारात या बाबत तोंडी तक्रार नगरपरिषदेचे अधिकारी यांना करण्यात आली असता, अतिक्रमण विभागाच्या संखे यांनी, मी नोटीस देऊन कारवाई करतो असे सांगितले…? पण अजूनही कारवाई शून्य असल्याचे समोर आले आहे.जेव्हा याची तक्रार झाली तेव्हा बॅनर हातावर मोजण्या इतके होते, पण आता पूर्ण रस्ता आणि नगरपरिषदेचे दिवाबत्ती चे खांब यावर सुद्धा बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनर लावून स्वच्छ सुंदर पालघर शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न झाल्याचे नागरिकांन कडून बोलले जात आहे. या बॅनर मध्ये पालघर मधिल माजी खासदार यांचा बॅनर तर रस्त्याच्या बाजूला रोड च्या लगत लावण्यात आला आहे.त्या मुळे या अनधिकृत बॅनर लावणाऱ्यावर कारवाई साठी टाळाटाळ होत आहे की काय….? असे दिसून येत आहे.नगरपरिषदेत आता कोणीही सत्ताधारी नसून प्रशासकाचे राज्य आहे, तरीही कारवाई करण्यास दिरंगाई होत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग तर तुम्ही रस्त्यावर दुकान टाका, फक्त आमचे खिचे गरम करा,या भावात वावरत आहे.या अनधिकृत बॅनर चा सर्वात जास्त त्रास हा रस्त्यावरील वाहतुकीस होत असून, वाहतूक पोलिस तर जिल्ह्यात येणाऱ्या विविआईपी साठी पायघडया घालण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून काय कारवाईची आशा सामन्य पालघर कर करणार…?आता पाहुयात प्रशासन अश्या अनधिकृत बिना परवानगी बॅनर वर कारवाई करते की, नागरिकांना याच्या त्रासाला सामोरे जायला भाग पाडते…?

ठळक /-

ज्या राजकीय नेते आणि पदाधिकारी यांचे हे बॅनर आहेत,त्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की आता काही दिवसावर निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे…? एकाला पाठीशी घालताना आपली मतांची बेरीज वजाबाकी मध्ये बदलून जाणार नाही ना…?त्याचा राजकीय फटका नेत्यांना नक्की बसेल. याची त्यांनी दक्षता घायला पाहिजे.

प्रतिक्रिया /-

मी अश्या अनधिकृत बॅनर वर कारवाई करायला संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो.

–उमाकांत गायकवाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद.

प्रतिक्रिया /-

अश्या बिनापरवानगी बॅनर लावणार्यांवर नोटीस देऊन कारवाई करण्यात येईल.

–आशिष संखे, अभियंता, सा. बा. विभाग, पालघर.

Leave a Comment