Palghar Nargrik

Breaking news

डहाणू विधानसभेत विनोद निकोलेंच्या उमेदवारीस उबाठा सैनिकांचा उघड उघड विरोध…?

तलासरी | मयूर ठाकुर
डहाणू विधानसभा मतदार संघ हा डहाणू तालुका आणि तलासरी तालुक्यात पसरलेला असून या मतदार संघाचे सी पी एम चे विनोद निकोले हे करत असून, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा उघडपणे विरोध असणार आहे. विनोद निकोले ह्यांनी उबाठा च्या लोकसभा उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळून माझ्या सी पी एम तर्फे दिड लाखाचे मतदान भारती कामडी यांना तलासरीत होईल असे सांगितले होते.पण प्रत्यक्षात भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत जी ८०८०० मते पडली ती शिवसेना उबाठा कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ आहे. लोकसभा निवडणुकी आधी महाविकास आघाडीचे आमदार विनोद निकोले कुठेही प्रचारात दिसून आले नाहीत.जर त्यांनी आघाडी धर्म पाळून आम्हाला मदत केली असती तर पालघर लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला असता…? आता आम्ही त्याचा बदला नक्की घेऊ, जर महाविकास आघाडीने विनोद निकोले यांना डहाणू विधानसभेत पुन्हा उमेदवारी दिली तर आम्ही त्यांना मदत न करता तटस्थ राहणार असल्याचे शिवेसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीत उबाठा उमेदवाराला ८०८०० तर भाजपा उमेदवाराला ८००००मते होती, आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारास १३०००, आणि इतर उमेदवारांना १५०००मते होती.त्या मुळे मतांची गणिते बघितल्यास उबाठा उमेदवार हा सी पी एम च्या असहकारा मुळे हरल्याची भावना तयार झाली आहे.पाच ऑक्टोबर ला झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळ्याव्यात विद्यमान आणि माजी सरपंच तसेच लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांनी विरोध दर्शवीला आहे.

 

सी पी एम च्या कार्यकर्त्यांनी मदत न केल्याने लोकसभेला आमचा उमेदवार हरला, आता त्याचा बदला आम्ही विधानसभेला घेणार.
–जयेश वाळवी, विभाग प्रमुख, उधवा उबाठा, तथा माजी सरपंच, उधवा,

५ तारखेला झालेल्या उबाठा गटाच्या कार्यकर्ता मेळ्याव्यात आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विनोद निकोले यांच्या उमेदवारीस विरोध आहे.
–अनिल कुऱ्हाडा, शिवसेना (उबाठा)शहर प्रमुख, तथा माजी सरपंच तलासरी.

Leave a Comment