पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,त्या बाबत पालघर जिल्हानिवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पालघर, गोविंद बोडके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.त्या नुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २२ ऑक्टोबर असून निवडणुकीची नाम निर्देशीत करण्याचा अखेर चा दिनांक हा २९ ऑक्टोबर हा आहे. नाम निर्देशीत पत्राची छाननी ही ३० ऑक्टोबर ला होईल, आणि ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारि अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे. २० नोव्हेंबर ला मतदान होणार असून, मतदानाची मतमोजणी २३ नोव्हेंबर ला होणार आहे.
पालघर मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ असून १३० पालघर मतदार संघा साठी महेश सागर तर १३१ बोईसर साठी सुनिल माळी,१२९ विक्रमगड साठी करिष्मा नायर,१२८ डहाणू साठी सत्यम गांधी, १३२ नालासोपारा साठी शेखर घाडगे, आणि १३३ वसई साठी संदीप चव्हाण हे निवडणुकीत निर्णय अधिकारी असतील.