पालघर | मयूर ठाकूर
बोईसर येथिल दिपणकर इन्व्हेस्टमेंट कंपनी या कंपनीने शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून जास्त व्याजाने परतावा देण्याच्या अमिषाने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून अनेकांना गंडा घातला आहे.या बाबत बोईसर पोलिस ठाणे येथे काही गुंतवणूक दारांनी तक्रार दाखल केली होती, ही तक्रार आर्थिक गुन्हे शाखा पालघर मध्ये वर्ग केला होता, आर्थिक गुन्हे शाखा पालघर चे अधिकारी कर्मचारी यांनी अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शना खाली उप अधीक्षक अनिल लाड, पी एस आई धनराज शिरसाड यांनी तपास करून दिपणकर इन्व्हेस्टमेंट चे सूर्यकांत भिवाजी कांबळे आणि जयेश जगन्नाथ संखे यांना अटक केली आहे, या बाबत अजून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघर हे करीत आहेत. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुंतवणूक केलेल्या आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना तक्रार देण्यासाठी समोर येण्यास सांगितले आहे, तसेच अश्या आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंपनी मध्ये आपली जीवनाची कमाई गुंतवणूक करताना विचार करावा. असे आवाहन केले.