बोईसर | प्रतिनिधी
बॅनर होर्डिंग च्या माध्यमातून शुभेच्छा देणे, स्वतःची प्रसिद्धी करण्याचा अनेकांना छंदच लागलेला आहे. आता बॅनर होर्डिंग लावणे म्हणजे काही मोठी गोष्टही राहिली नाही. बोईसर शहरातील मुख्य चौकात अनेक ठिकाणी लावलेल्या बॅनर ने बॅनर्स ची स्पर्धाच रंगल्याचे दिसून येते. तर मुख्य मार्गावरील काही चालू विद्युत खांबावर बॅनर होर्डिंग लावल्याचे दिसून येत असून याकडे मात्र महावितरनचे दुर्लक्ष दिसून येत आहे. तर लोकप्रतीनिधींना सुद्धा नियमाचा विसर होतांना दिसून येत आहे.
बोईसर शहरातील यशवंत सृष्टी येथील महावितरणच्या एका चालू विद्युत खांबावर डायरेक्ट फॅक्टरी सेल नावाचे बॅनर लावल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून या खांबावर बॅनर लावतांना दिसून येत असल्याने या अशाप्रकारे बॅनर होर्डिंग लावणे वैध आहे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. चक्क कारखान्यातील बॅनर खांबावर लावला असल्याने महावितरण कारवाई करणार काय ? महावितरणची बॅनर होर्डिंग खांबावर लावण्यास मुकसंमती तर नाही ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे. फॅक्टरी सेल बॅनर होर्डिंगच त्याठिकाणी अनेक दिवसांपासून विविध सण उत्सव, इतर प्रकारांचे बॅनर होल्डिंग लावण्यात येत असल्याने महावितरणने कारखान्याला विद्युत खांब आंदण तर दिले नाही, सामान्यांना वेगळे नियम आणि अशा मुजोर कारखानदारांना दुसरे नियम आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होते. यावरुन महावितरण केवळ वीज चोरी कुठून होते, कोणाचे वीजबिल थकीत आहे, थकीत असेल तर वीज कट करणे याकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र चालू खांबावर लावण्यात आलेल्या बॅनर वर मात्र कोणतीही कारवाई करत नाही हे विशेष.
(या बाबत महावितरण च्या कार्यकरी अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता यांना भ्रमण ध्वनी वर संपर्क केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थाता दर्शवली.)