Palghar Nargrik

Breaking news

खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विक्रमगड. विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

सेवा हेच संघटन’ हा मंत्र घेऊन समाजकारणाला पहिले प्राधान्य देणारा #BJP हा एकमेव पक्ष आहे, त्यामुळे सामाजिक कार्याची तळमळ असणारे अनेक नागरिक गेल्या काही वर्षांपासून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीराज्याचे नेते उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून हिंदुत्व, देशहित आणि समाजाच्या हितासाठी काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर पक्षप्रवेशावेळी ज्येष्ठ नेते गुजरात चे आमदार अमरीश भाई ढेर, विक्रमगड विधानसभा निरीक्षक जयदीप राठोड, श्री. बाबाजी काठोळे सर, श्री हरिश्चंद्र भोये, कृषी सभापती श्री.संदिप पावडे, तालुकाध्यक्ष श्री.दिपक पावडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.महेश आळशी,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री. पुंडलिक भानुशाली, जिल्हा उपाध्यक्ष श्री.मधुकर खुताडे, सरचिटणीस श्री निशिकांत संखे, कमलाकर भोईर, रवी भडांगे, युवा मोर्चा जिल्हा सचिव श्री.हरेश देसले, पंचायत समिती सदस्य सुभाष भोये, मनोज बोरसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदेश भोगाडे, सुरेश देवळे, किरण पंडित, प्रकाश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment