पालघर 22 ऑक्टोबर
पालघर आगाराच्या एसटी बसेसची अवस्था भंगार गाड्यांपेक्षाही रद्दड झालेली आहे बस चालकांची केबिन व आसन व्यवस्था तुटलेल्या स्थितीत आहे. प्रवाशांना व वाहन चालकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वेळोवेळी तक्रार करून सुद्धा पालघर आगाराकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी बस मधून प्रवास कमी सोडून दिले आहे. यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून संघटना व प्रवासी रस्त्यावर उतरून बस अडवून धरणार असल्याचा इशारा सातपाटी ग्रामस्थ बस प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक वर्तक यांनी पालघर आगाराला निवेदनाद्वारे दिला आहे.
पालघर आगाराच्या या बस मधून प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण असल्याने सातपाटी माहीम वडराई केळवे इथल्या दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे व रिक्षाचा आसरा घेतला आहे. यामुळे राज्य परिवहन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे मात्र याबाबत यांना काहीच पडले नसल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप सातपाटी ग्रामस्थ बस प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक वर्तक यांनी केला आहे.
कामाला जाणारे कामगार महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला यांना वेळेवर आपल्या इच्छित स्थळी पोहोचता येत नाही. त्यांना त्यामुळे त्यांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागतो बहुसंख्य प्रवासी व विद्यार्थ्यांकडे मासिक व तैमासिक पासेस आहेत बस वाहतूक वेळेवर नसल्यामुळे या पासचे पैसेही मोफत जात आहेत. या भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र इथल्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बसची अवस्था बघून व अनियमितेमुळे बस सेवेला रामराम ठोकत खाजगी रिक्षाने प्रवास करणे पसंत केले आहे.
गौरी गणपतीच्या सणामध्ये बसेस कोकणाकडे पाठवल्यामुळे दररोजच्या अनेक फेऱ्या या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आता दिवाळी सणांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती निर्माण होणार आहे का असाही प्रश्न प्रवासी संघटनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. प्रवासी राजा अभियान मध्ये प्रवाशांच्या व प्रवासी संघटनेच्या तक्रारी कागदावरच राहिल्या आहेत प्रत्यक्षात कोणताही निर्णय अजून पर्यंत घेण्यात आला नाही प्रवासी संघटनांनी विभागीय नियंत्रक आगार व्यवस्थापक यांच्या संदर्भात लेखी तक्रार करीत असून त्यांच्याकडून एकच उत्तर मिळते गाड्या व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे व प्रवासी राजा दिन हा देखाव्यापुरताच आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दररोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून पालघर स्टेशन ते मुख्य रस्त्यापर्यंत प्रवासी व विद्यार्थी यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात एक एक तास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते बस संदर्भात वाहतूक नियंत्रकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून नीट उत्तरही मिळत नाही प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांचा फोन ही नियंत्रक घेत नाहीत मग प्रवाशांनी दाद कोणाकडे मागावी रोज शंभर ते 150 प्रवासी भारमान फेऱ्या रद्द होतात विद्यार्थ्यांच्या शालेय फेऱ्या उशिरा पाठवल्या जातात किंवा रद्द केल्या जातात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आठ महिन्यापासून प्रवासी संघटना सातत्याने विभागीय नियंत्रक आगार व्यवस्थापक यांच्या पत्रव्यवहार करत आहे व त्यांच्या भेटी ही घेत आहे तरीही त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नाही त्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून प्रवासी व संघटना पूर्व सूचना न देता गाड्या अडवण्याच्या विचारावर आले आहेत.