Palghar Nargrik

Breaking news

डहाणूमध्ये जन सुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ ७,००० लोकांचा संतप्त मोर्चा

डहाणू । सन्नान शेख

२२ एप्रिल : रोजी पालघर जिल्ह्यात डहाणू तहसील कार्यालयावर ७,००० हून अधिक स्त्री-पुरुषांच्या संतप्त मोर्चाने भाजप सरकारने आणलेल्या हुकूमशाही स्वरूपाच्या जन सुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध केला. सागर नाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा ५ किमी उन्हातान्हात चालून डहाणू तहसील कार्यालयावर पोहोचला. ठाणे-पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात असे जबरदस्त मोर्चे आज निघाले.

डहाणूच्या मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सिंहाचा वाटा तर होताच, शिवाय शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कष्टकरी संघटना हे महाविकास आघाडीचे घटक, तसेच आदिवासी एकता परिषद, भूमी सेना, वाढवण बंदर विरोधी कृती समिती या सर्व संघटना सुद्धा सहभागी होत्या.

मोर्चाचे नेतृत्व करून प्रचंड सभेला संबोधित करणाऱ्यांमध्ये डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, रडका कलांगडा, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखना, ब्रायन लोबो, मधु धोडी, व वरील पक्ष-संघटनांच्या अनेक नेत्यांचा समावेश होता.

पालघर टाउन में विश्वास का दूसरा नाम — KK GROUP
SINCE 1999

हम हैं KK GROUP – जहां हर ईंट में बसा है भरोसा, हर मंज़िल में झलकता है अनुभव।

पालघर के दिल में पिछले 25 सालों से लोगों का सपना साकार कर रहे हैं।
सच्चाई, गुणवत्ता और समय की पाबंदी – यही हमारी पहचान है।

आपके सपनों का आशियाना हो या कोई नया प्रोजेक्ट –
KK GROUP हमेशा तैयार है, आपके साथ, आपके लिए।

KK GROUP – PALGHAR KA VISHWASU BUILDER

Leave a Comment