पुण्याच्या कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन समारंभ आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. याकरता सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवं धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतंही रुग्णालय नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू होणार आहे. राज्य शासन रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देतं.
वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. आपलं मानसिक आरोग्य चांगलं राखून निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया आहे, या विचारानं सर्वांनी काम करावं, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजे, असं यावेळी सूचित केलं.
पालघर टाउन में विश्वास का दूसरा नाम — KK GROUP
SINCE 1999
हम हैं KK GROUP – जहां हर ईंट में बसा है भरोसा, हर मंज़िल में झलकता है अनुभव।
पालघर के दिल में पिछले 25 सालों से लोगों का सपना साकार कर रहे हैं।
सच्चाई, गुणवत्ता और समय की पाबंदी – यही हमारी पहचान है।
आपके सपनों का आशियाना हो या कोई नया प्रोजेक्ट –
KK GROUP हमेशा तैयार है, आपके साथ, आपके लिए।
KK GROUP – PALGHAR KA VISHWASU BUILDER