Palghar Nargrik

Breaking news

गॅस सिलेंडर, ATM ते रेल्वे तिकीट बुकिंग; आजपासून 5 नियमांत महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशावर परिणाम होणार

आज मे महिन्याच्या सुरुवाच झाली आहे आणि सुरुवातीलाच काही नियमांत बदल झाला आहे. या बदललेल्या नियमांमुळं ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. 1 मे 2025 पासून लागू झालेल्या नवीन नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. देशात एटीएमपासून ते भारतीये रेल्वेच्या तिकीट बुकिंगसंदर्भात काही नियम बदलण्यात आले आहेत. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात. 

आजपासून 1 मे पर्यंत एटीएममधून पेसै काढणे महागणार आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, NPCI च्या प्रस्तावानुसार शुल्कात वाढ करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं 1 मे पासून ग्राहक बँकेच्या एटीएमशिवाय दुसऱ्या नेटवर्कच्या बँकेतील एटीएममधून पैसे काढत असतील तर त्यांना प्रत्येक ट्राझेक्शनवर 17 रुपयांऐवजी 19 रुपये द्यावे लागणार आहेत. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून बॅलेन्स चेक करायचा झाल्यास 6 रुपयांच्याऐवजी 7 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

त्या व्यतिरिक्त अनेक मोठ्या बँकांनी त्यांच्या वेबसाईटवर फ्री लिमिटनंतर ट्रान्झेक्शनवर लागणाऱ्या चार्जबाबतही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. HDFC बँकेनुसार, Free Transaction Limit हून अधिक देवाणघेवाण झाल्यास 1 मेपासून 21 रुपये + टॅक्स लागणार आहे. त्याचबरोबर एटीएम शुल्क वाढवून 23 रुपये + टॅक्स केला जाणार आहे. तर, पीएनबी आणि इंडसइंड बँक एटीएममधून कॅश विड्रोलवर 23 रुपयांचे शुल्क अकारण्यात येईल. 

  • रेल्वेचा नियम बदलला

1 मे 2025 पासून दुसरा नियम बदलला तो म्हणजे रेल्वेचा. रेल्वे तिकीट बुकिंगसंदर्भातील हा नियम आहे. आता वेटिंग तिकीट फक्त जनरल कोचमध्येच ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजेच तम्ही वेटिंग तिकीटावर स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकणार नाही. तसंच, अॅडव्हान्स रिझर्व्हेशनचा कालावधी 120 दिवसांनी कमी करुन 60 दिवसांवर आला आहे. 

  • 11 राज्यात RRB योजना 

मे महिन्याच्या सुरुवातीला मोठा बदल होत आहे. 1 मे 2025 पासून देशातील 11 राज्यातील One State One RRb योजना प्रस्तावित आहे. जी आजपासून लागू होऊ शकते. या अतंर्गंत राज्यातील सर्व ग्रामीण बँका एकत्र जोडून एक मोठी बँक बनवली जाणार आहे. यामुळं बँकिग सेवा आणखी सोयीच्या होणार आहेत. हा बदल UP, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य राज्यात लागू होऊ शकतो. 

  • चौथा नियम

अमूलने दूधाच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. अमूलचे उत्पादनांची नव्या किंमती 1 मेपासून लागू होणार आहे. देशभरात दूधाची किंमत दोन रुपये प्रति लीटरने वाढली आहे. याआधी मदर डेअरीनेदेखील दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या. 

  • पाचवा नियम

आजपासून, 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 17 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत 14.50 रुपयांनी कमी होऊन 1747 रुपयांवर आली आहे. पूर्वी ते 1762 रुपयांना उपलब्ध होते. कोलकातामध्ये ते 17 रुपयांनी कमी किमतीत 1851 रुपयांना उपलब्ध आहे, पूर्वी त्याची किंमत 1868.50रुपये होती.

मुंबईत सिलिंडरची किंमत ₹14.50 ने कमी होऊन ₹1713.50 वरून ₹1699 झाली आहे. चेन्नईमध्ये, सिलिंडर ₹ 1906.50 मध्ये उपलब्ध आहे. तथापि, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हे दिल्लीमध्ये ₹853 आणि मुंबईत ₹852.50 मध्ये उपलब्ध आहे. 



Leave a Comment