Palghar Nargrik

Breaking news

पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत मोठी कामगिरी

पालघर प्रतिनिधी – सन्नान शेख✒️

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक उज्ज्वल कामगिरी केली आहे.

या सात कलमी कार्यक्रमात खालील विषयांचा समावेश होता:

  1. पोलीस वेबसाईटचे अद्ययावतीकरण
  2. सुकर जीवनमानासाठी उपक्रम
  3. स्वच्छता अभियान
  4. तक्रार निवारण प्रणाली
  5. कार्यालयीन सुविधा सुधारणा
  6. औद्योगिक व आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन
  7. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी

पालघर जिल्हा पोलीस दलाने या सर्व विषयांवर नविन तंत्रज्ञानाच्या आधारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत.
त्यामध्ये उल्लेखनीय बाबी म्हणजे

  • पोलीस वेबसाईटचे पूर्ण अद्ययावतीकरण व User Friendly डिझाईन
  • नागरिकांसाठी Chat Box सुविधा
  • सायबर सुरक्षित पालघर” ही मोहीम
  • AI आधारित Chat Bot चा वापर
  • तक्रार निवारण दिनाचे आयोजन
  • ई-ऑफिस कार्यपद्धतीची अंमलबजावणी
  • Visitor Management System
  • कार्यालयीन कामकाजात AI चा वापर
  • पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी “थर्ड आय” अ‍ॅप्लिकेशन

या संपूर्ण कार्यक्रमाची गुणवत्ता तपासण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेकडून (QCI) १०० दिवसांचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पालघर पोलीस दलास १०० पैकी ९०.२९ गुण प्राप्त झाले आहेत. ही एक लक्षणीय आणि प्रेरणादायी यशोगाथा आहे.

या यशामागे पोलीस अधीक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. विनायक नरळे यांचे नेतृत्व व दृष्टीकोन असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणेप्रमुख, अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय मेहनत घेतली आहे.

याआधीही ५० दिवसांच्या मूल्यांकनात पालघर पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला होता, आणि आता १०० दिवसांच्या कामगिरीने त्यांनी हे स्थान पुन्हा सिद्ध केले आहे.

पालघर पोलीस दलाचे हे यश संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे आणि इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. पालघर पोलीस दलातील खालील चार पोलीस अधिकारी/अंमलदार यांना पोलीस दलामध्ये केलेल्या प्रशंसनीय/गुणवत्तापुर्ण सेवेसाठी मा. पोलीस महासंचालक यांचे पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले.

  • श्रेणी पोउपनि/दिनेश तुळशीराम पाटील
  • सहा.पोउपनि/महेंद्र सुभाष शर्मा
  • पो.हवा./मुद्दसर मुस्ताक दांडेकर
  • पो.हवा./पराग कमळाकर म्हात्रे

आज रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. गणेश नाईक यांचे शुभहस्ते सदरचे पोलीस महासंचालक पदक नमूद अधिकारी/अंमलदार यांना प्रदान करण्यात आले. तसेच मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी त्यांचा गौरव केला.



Leave a Comment