Palghar Nargrik

‘मधुर’ हॉटेलमधली गोड धूळफेक: जलेबीवर माशा – रस्त्यावर गाड्या! प्रशासन झोपलंय की हातात हात घेतलाय?

प्रतिक मयेकर  

बोईसर, २ जून – बोईसर शहरात “मधुर हॉटेल” हे नाव गोड जेवणासाठी ओळखले जात असले तरी, आता ते गोडाच्या नावाने गोंधळ माजवणारे ठिकाण ठरत आहे. एकीकडे गोड पदार्थांवर माशांचा मुक्त संचार, तर दुसरीकडे हॉटेलसमोर उभ्या केलेल्या गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी – या दुहेरी त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

माशांची मधुर मेजवानी!

‘मधुर’ हॉटेलमध्ये जलेबीसारखे गोड पदार्थ उघड्यावर ठेवले जात असून, त्यावर माशांचा वावर सर्रास दिसून येतो. ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येईल इतकी गलिच्छ परिस्थिती असूनही, हॉटेल प्रशासन बेफिकीर आहे आणि आरोग्य विभाग झोपेत आहे. मिठाईवर बसलेले डास, बारीक माशा हे चित्र पाहिल्यानंतर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीची भूक हरवेल, हे निश्चित! खालच्या ट्रेमध्ये ठेवलेले ढोकळा जाळीखाली ठेवलेले असले तरी, तोही माशांपासून पूर्णपणे सुरक्षित नाही. साफसफाई आणि अन्न सुरक्षा नियम पायदळी तुडवले जात असताना, खाद्य सुरक्षा निरीक्षकांची भूमिकाही संशयास्पद वाटते.

Oplus_16908288

रस्ता अडवून खाणारी ‘मधुर’ मंडळी!

या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. पार्किंगची कोणतीही सोय नसताना, चारचाकी व दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी बेधडकपणे उभी केली जातात. परिणामी, या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

 

Leave a Comment