Palghar Nargrik

जिल्हा वाहतुक शाखा पालघर,तर्फे दांडेकर कॉलेज येथे वाहतूक नियम जनजागृती उपक्र

📍पालघर

विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, आज दिनांक 16 जुलै
2025 रोजी दांडेकर कॉलेज, पालघर येथे जिल्हा वाहतुक शाखा पालघर तर्फे वाहतूक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश साळुंखे
प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतुक शाखा पालघर,पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे, पोलीस उपनिरीक्षक बायक्या सुतार, ASI पंढरीनाथ कराटे, पोलीस हवालदार
संतोष हाडळ, पोलीस हवालदार भास्कर चौधरी व पोलीस अंमलदार शिवा राठोड यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत कृषी महाविद्यालय, आसनगाव येथील पथकही उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पुढील मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले-
वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे,
हेलमेट परिधान करणे,
त्रिकुट चालवणे (ट्रिपल सीट) टाळणे,लहान वयाच्या मुलांनी वाहन न चालवणे,योग्य वयात परवाना (लायसन्स) काढणे,
भरधाव वेगाने वाहन न चालवणे असे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह विद्यार्थ्यांना कायदे, नियम आणि अपघातांची टक्केवारी यांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व वाहतूक नियमांचे महत्व समजून घेतले.

Leave a Comment