Palghar Nargrik

मनोर पोलीसांची मोठी कारवाई दोन आरोपींना २ वर्ष सश्रम कारावास आणि दंड.

📍 पालघर.

पालघर नागरिक ब्रेकींग न्यूज.
18.07.2025

* मनोर पोलीसांची मोठी कारवाई दोन आरोपींना २ वर्ष सश्रम कारावास आणि दंड.

दिनांक: 17 जुलै 2025 | ठिकाण: पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याच्या प्रकरणात मनोर पोलीस ठाण्याने मोठी यशस्वी कारवाई केली आहे.

गुनाह क्रमांक 07/2020 अंतर्गत दोन आरोपींना पालघर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने २ वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी ₹5,000 चा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपींची नावे.
वसीम वली मोहम्मद सिलीया 2. सेरिश्या मोहम्मद यासीन ही घटना 16/02/2020 रोजी मनोर घडली होती. गुजरातहून आलेल्या वाहनातून ताज इन हॉटेलच्या कोपऱ्यात ₹56,812 किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला होता.

 

मनोर पोलीस ठाण्याचे माजी अधिकारी श्री. एम. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तलासरी पोलिसांच्या सहकार्याने ही यशस्वी कारवाई झाली.

सरकारी वकील श्री. अरुण मसराम यांनी प्रभावीपणे युक्तिवाद सादर केला.मा. न्यायाधीश श्रीमती ए. आर. राठोड यांनी आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली.

हा निकाल पालघर जिल्ह्यातील इतर गुटखा विक्रेत्यांसाठी एक कडक इशारा ठरेल.

मात्र अजूनही मनोर व पालघरमध्ये गुटखा माफियांचा सुळसुळाट! ताजी कारवाई कौतुकास्पद असली तरी, जिल्ह्यात अजूनही गुटखा होलसेलर खुलेआम व्यापार करताना दिसत आहेत.

📍 मनोर. नाजिम आणि सोहेल हे दोघं मनोरमध्ये गुटख्याचा माल सकाळ-संध्याकाळ खुलेआम डिलिव्हरी करत असल्याचे व्हिडिओ आणि फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.यांच्यावर मनोर, सफाळा, आणि तलासरी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असूनही पोलीस अजूनही त्यांना अटक करत नाहीत.

📍 पालघर.शहरात “दिलावर” नावाचा गुटखा होलसेलर अजूनही खुलेआम विक्री करत आहे.

❗सवाल उभा राहतो — पोलीस विभाग केवळ किरकोळ दुकानदारांवरच कारवाई का करतो?*आणि हे मुख्य पुरवठादार मोकळेच का फिरतात?

🙏 पालघर नागरिक ग्रुपचा थेट सवाल माननीय एसपी सतीश देशमुख साहेबांना “गुटखा माफियांवर FIR आणि अटक कधी होणार?

✍ जावेद लुलानिया
पत्रकार व संपादक – पालघर नागरिक
📍 मुद्रा शॉपिंग कॉम्प्लेक्स, पालघर
📞 8806247860

Leave a Comment