Palghar Nargrik

‘मधुर’ हॉटेलमधली गोड धूळफेक: जलेबीवर माशा – रस्त्यावर गाड्या! प्रशासन झोपलंय की हातात हात घेतलाय?

प्रतिक मयेकर   बोईसर, २ जून – बोईसर शहरात “मधुर हॉटेल” हे नाव गोड जेवणासाठी ओळखले जात असले तरी, आता ते गोडाच्या नावाने गोंधळ माजवणारे ठिकाण ठरत आहे. एकीकडे गोड पदार्थांवर माशांचा मुक्त संचार, तर दुसरीकडे हॉटेलसमोर उभ्या केलेल्या गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी – या दुहेरी त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे … Read more

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शोकांतिका! एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू – मृत्यूसमोर हातपाय मारत होती एक लहानगी…

प्रतिक मयेकर  बोईसर, वाडा-खडकोना परिसर | ११.३० AM: आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मनोर गेट हॉटेलसमोर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी कारला झालेल्या दुहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, आणि एक लहान मुलीसह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एक कंटेनर समोरून, आणि मागून येणाऱ्या अवजड वाहनाने मधोमध चिरडलेली … Read more

‘जहां PAK सेना ने सोचा तक नहीं था, वहां हमारी सेना ने आतंकी ठिकानों को मिट्टी में मिला दिया’, PM मोदी के भाषण की 10 बड़ी बातें

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भोपाल पहुंचकर देवी अहिल्याबाई होल्कर की 300वीं जयंती पर डाक टिकट जारी किया. इसके अलावा उन्होंने इंदौर में मेट्रो सेवा और दतिया-सतना एयरपोर्ट का लोकार्पण किया. पीएम मोदी ने जनसभा को संबोधित करते हुए कहा कि आज का कार्यक्रम देवी अहिल्या बाई की सोच को आगे बढ़ाने वाला है. इस दौरान … Read more

बोईसर यशवंत सृष्टी अपघात: अधिकारी नाहिशी, युवकांनी घेतली जबाबदारी; स्वखर्चाने उभारला रेडियम खांब!

प्रतिक मयेकर  बोईसर: यशवंत सृष्टी परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. सदर डिव्हायडर न पाहिल्यामुळे वाहन जोरात धडकले आणि दुर्दैवी व्यक्तीने आपले प्राण गमावले. सदर ठिकाणी अंधार, रेडियमशून्य डिव्हायडर आणि कोणताही चेतावणी फलक नसल्यानं हा अपघात टाळता आला नाही. या … Read more

एमआयडीसीला जाग येण्यासाठी ‘खड्ड्यात बसून भीक’ – सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा आंदोलनात्मक प्रतिकार!”

प्रतिक मयेकर  तारापूर / बोईसर –एमआयडीसीच्या रस्त्यांवरील असंख्य खड्ड्यांनी वाहनचालकांचे कंबरडे मोडले असतानाच, अधिकाऱ्यांच्या ‘ठोस’ निष्क्रियतेविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘खड्ड्यात बसून भीक मागत’ थेट आंदोलन सुरू केलं आहे. हे दृश्य पाहून नागरिक चक्रावले, काही हसले… पण सर्वांनी मान्य केलं – “अशा वेळी हेच उरलंय!” “खड्ड्यांमध्ये गाड्या नाही, माणसंच बसायला लागलेत आता!” सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे … Read more

तारापूर औद्योगिक क्षेत्रात खड्ड्यांचा स्फोटक प्रश्न : नवीन रस्त्याचं गाजर, पण जुन्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष!

प्रतिक मयेकर बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेले रस्त्याचे नवीन काम हे केवळ दिखाऊ ठरत असून, प्रत्यक्षात नागरिकांना आणि कामगारांना अजूनही खड्ड्यांच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरही जुन्या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे जसाच्या तसा असून, ते बुजवण्याऐवजी प्रशासनाने नवीन रस्त्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतले आहे. पावसाची पायघड…पण खड्ड्यांच्या स्वागताने! सध्या सुरू असलेल्या … Read more

ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी हक्क संघर्ष समितीची महत्वपूर्ण बैठक पालघरमध्ये…

पालघर: गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामुळे निवडणुका रखडल्या होत्या. मात्र नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर व ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांसाठी जागरूक करण्याच्या उद्देशाने ‘ओबीसी हक्क संघर्ष समिती, पालघर जिल्हा’च्या वतीने … Read more

“पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात दिशाभूल करणारे सूचना फलक – नागरिकांची फसवणूक?”

प्रतिक मयेकर पालघर: जिल्हाधिकारी कार्यालयातील एका सूचना फलकामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. फलकावर मोठ्या ठशात लिहिले आहे की येथे नागरिकांसाठी अर्ज लिहिण्यासाठी टेबल, खुर्ची, पेन, पेपर व स्टेपलर उपलब्ध आहे. मात्र प्रत्यक्षात त्या जागेची स्थिती अत्यंत दयनिय आहे. भिंतीला चिकटवलेला हा फलक केवळ औपचारिकतेपुरता असल्याचे या छायाचित्रावरून स्पष्ट होते. जुना व खराब टेबल, पेन … Read more

आमदारांचे दौरे आणि ‘पीएं’ चे कारनामे

महाराष्ट्रात भ्रष्ट अधिकाऱ्यांना व राजकारण्यांना ‘अभय’ मिळत असल्याने भ्रष्टाचार राजरोस सुरू आहे. रोज कुठे ना कुठे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस येते आणि शासनाच्या भ्रष्ट कारभाराचे धिंडवडे निघतात. पुराव्यांसह प्रकरणं बाहेर येतात, मात्र कारवाई कुणावरही होत नाही. सर्वांनाच ‘क्लीनचिट’ मिळते; कारण खालपासून वरपर्यंत या भ्रष्टाचारामधे सर्वजण सामील असतात. त्यामुळे कारवाई कुणावर करायची ? हाच मोठा प्रश्न असतो. … Read more

पालघर जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी – “MH-60” कोडसह नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी!

पालघर: आदिवासी बहुल आणि वेगाने विकसित होत असलेल्या पालघर जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले असून, आता MH-60 हा जिल्ह्याचा स्वतंत्र वाहतूक क्रमांक असणार आहे.लोकदरबारातील आश्वासन झाले पूर्ण ९ एप्रिल रोजी पालघर येथे संपर्कमंत्री या नात्याने … Read more