Palghar Nargrik

Breaking news

‘रात्री माझे हात-पाय…’, जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, ‘सरकारचा जीव…’

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनंतर उपोषणा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटलांवर रात्री उपचार करण्यात आले. सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं. रात्री सलाईन लावण्यात आल्यानंतर सकाळी पुन्हा सलाईन काढण्यात आलं. मात्र सलाईन लावल्याचं आपल्या लक्षात आलं नाही. आता सलाईन लावल्यानंतर उपोषण करण्यात काय अर्थ आहे? असं म्हणत आपण उपोषण मागे घेत … Read more

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, ‘या’ 17 जिल्ह्यांसाठी अलर्ट

मुंबईसह महाराष्ट्राला गेल्या काहि दिवसांपासून पावसाने झोडपले होते. अजूनही राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील तलावांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसांनी पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. … Read more

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

  मुंबई, दि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विषयावर सह्याद्री … Read more

जव्हार वैशिष्ट्य पूर्ण सोलर योजनेत भ्रष्टाचार…? –अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगणमताने झाला भ्रष्टाचार…? Part 1

  पालघर | मयूर ठाकूर जव्हार नगरपरिषद हद्दीतील सोलर दिवे लावण्यासाठी माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या फंडातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून कंत्राट हे गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार यांना देण्यात आले होते. ते काम गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार यांनी न करता पालघर वेवर येथिल सब कंत्राटदार यांनी केलेले असल्याचे समोर आले आहे. गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर … Read more

वाडा तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व्यसनमुक्तीची दिंडी

१७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिक्षक संचालित शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा, तालुका वाडा, जिल्हा पालघर, समाजकल्याण विभाग, पंचायत समिती वाडा शिक्षण विभाग, आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा परिषद चे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथे व्यसनमुक्तीची दिंडी चे … Read more

इंजेक्टेबल ड्रगचा वापर ; त्रिपुरातील विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीचा उद्रेक कसा होतो.

त्रिपुरामध्ये एचआयव्हीच्या भयावह प्रादुर्भावामुळे 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.आणि 828 इतरांना संसर्ग झाला आहे, अशी बातमी एएनआयने त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. त्रिपुरा जर्नालिस्ट युनियन, वेब मीडिया फोरम आणि TSACS यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या मीडिया कार्यशाळेत ही घोषणा झाली, जिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीच्या गंभीरतेला संबोधित केले. “आम्ही आतापर्यंत एचआयव्ही पॉझिटिव्ह … Read more

त्यानं माझ्या बायकोला फरफटात नेऊन मारले ;आता मीही त्याला फरफटात नेईन ! बायको गमावलेल्या नाखवांचा संताप…?

वरळी परिसरात झालेल्या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु आहे, नाखवा जोडपे नेहमीप्रमाणे मच्छी आण्यासाठी बाजारात गेले होते पण भरधाव वेगाच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली आणि कावेरी नाखवा यांना कार चालकाने फरफटत नेले झालेला प्रकार संतापजनक आहे नेटीझन्सकडून प्रकरणाची गंभीर दखल घेत सोशल मीडियावर मुंबई पोलिसांवर प्रश्नाची सरबत्ती करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर पिडीत कुटुंबाचा … Read more

पालघर. मनोर डोकं ठेचलेलं, स्कार्फ, छत्री आणि चपला विखुरलेल्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महिलेचा अर्धनग्न मृतदेह

एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नजीक आढळून आला आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नसून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे. महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात मार्गिकेवर उड्डाणपूलालगत असलेल्या सर्व्हिस रोडनजीक एका … Read more

वसई विरार शहर महानगरपालिकेची अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई

                          मा.आयुक्त यांचे आदेशानुसार व मा.अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा.उप-आयुक्त श्रीमती विशाखा मोटघरे यांच्या उपस्थितीत वसई विरार शहर महानगरपालिका जाहिरात विभागा मार्फत महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. दिनांक २७/०६/२०२४ प्रभाग समिती ‘डी’ अंतर्गत वसई पूर्व येथील … Read more