Palghar Nargrik

Breaking news

यावल पालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी २८ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात…!

, जळगांव जिल्ह्यातील तालुका असलेल्या यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर यापूर्वी अनेकदा लाज संबंधी आरोप करण्यात आले.(*तसेच पालघर या ठिकाणी असताना देखील यांनी खूप मोठे लाजे मध्ये पराक्रम केले. यांच्या सारखे ???? आधिकरी महाराष्ट्र ल लाभले असून लालच बुरी बला है *) याच्या पासून बोध न घेणारे सदरील मुख्याधिकारी बबन तडवी हे कंत्राटदाराकडून २८ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाकडून आज रंगेहात अटक करण्यात आल्याने नगरपालिका स सह संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की एका कंट्रोकदाराला साठवण बंधार्‍याचे काम मिळवून देण्यासाठी सदरील मुख्याधिकार्‍यांनी लाचेची मागणी केली होती.यामुळे संबंधीत कंत्राटदाराने जळगांव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली असता त्यानुसार पथक तयार करण्यात आलेले पथकाने आज दि.३० जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास यावल येथील नगरपालिकेत सापळा रचत २८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात मुख्याधिकारी बबन तडवी यांना या पथकाने पकडून जागीच अटक करून थेट त्यांना घेऊन पथक जळगांवकडे रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे नगरपालिका वर्तुळात हादरे बसले असून शहरात एकच खळबळ उडाली. यानंतर यावल शहरात सदरील घटनेची चर्वण सुरू झाले आहे. कंत्राटदारांना आपली कामे मंजूर करून घेण्यासाठी अधिकाऱ्याना हजारो लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

तसेच देशभरात लाजेची मागणी केलेली रक्कम स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात सापडणाऱ्या विविध विभाग व क्षेत्रातील अधिकारी यांना थेट जेलची हवा खावी लागते. सदरील घटनांमध्ये अधिक भर टाकण्यासाठी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी लाजे ची मागणी केलेली २८ हजारची रक्कम स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकले. लालच बुरी बला है हे लक्षात ठेवून आतातरी या घटनांपासून इतरांनी बोध घ्यावा.

Leave a Comment