Palghar Nargrik

Breaking news

Break The Chain: ठाणे जिल्ह्यासाठी अनलॉकचे नवे नियम…..

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये नुकतीच सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंत तर उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. लोकल सेवेला मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आली नाही. ठाणे जिल्ह्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात अनलॉकची नवी मियमावली आली आहे. या नव्या नियमानुसार सोमवार ते शनिवार रात्री १० पर्यंत राहणार दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी पार्सल सुविधा वगळता पूर्ण दिवस दुकान बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मॉल्स,चित्रपट गृह आणि नाट्यगृह पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. ५०% च्या क्षमतेने हॉटेल व बार रेस्टॉरंट संध्याकाळी ४ पर्यंत असणार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खाजगी व सरकारी आस्थापना १००% च्या क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा कोव्हिड पॉझिटिव्ह रेट १.७६ % तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची क्षमता ९.२६ % ठाणे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानं ठाण्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

लोकलबाबत निर्णय काय?
राज्यात सर्वसामांन्यासाठी लोकल बंदच आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीत लोकल रेल्वेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबबातचा निर्णय हा प्रशासनाशी बोलून घेण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळं बंदच
राज्यातील सर्व धार्मिक क्षेत्र ही बंदच राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भक्त गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असते. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

Leave a Comment