राज्यसरकारने 15ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे प्रवास करता येणार आहे. त्यासाठी मुंबई प्रमाणे वसई विरार महापालिकेच्या वतीने दोन डोस घेतलेल्या नागरीकांचे प्रमाणपत्र तपासणीसाठी आणि रेल्वे प्रवासाचा पास देण्यासाठी रेल्वे स्थानकात कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्प द्वारे रेल्वे प्रवास करण्यासाठी नागरिकांना पास मिळणार आहे..
कसा मिळणार लोकलचा पास?
– छायाचित्र ओळखपत्र देखील पुरावा म्हणून आवश्यक
– कोविन ऍपवर प्रमाणपत्राची वैधता तपासणार
– प्रमाणपत्र वैध असल्यास पालिकेचा शिक्का लागणार
– शिक्के मिळालेले अंतिम प्रमाणपत्र रेल्वे तिकीट खिडकीवर दाखवा
– पडताळणी पात्र ठरल्यास 15 ऑगस्टपासून प्रवासाची मुभा
– बनावट कोरोना प्रमाणपत्र दिल्यास कठोर पोलीस कारवाई
दरम्यान, लोकल प्रवास करता यावा म्हणून मुंबईकर आतुर झाले आहेत. रोजच्या बसच्या कटकटीतुन त्यांची सुटका होणार आहे. प्रवासासाठी मुंबईकरांनी लसवंत असणं गरजेचं आहे. 53 रेल्वे स्थानकांवर पालिकेचे मदतकक्ष आहेत. ऑफलाईन पास मिळतोय. यामध्ये 45 वर्षांवरील नागरिक अधिक दिसत आहेत.