Palghar Nargrik

Breaking news

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! बदलीसाठी अज्ञात व्यक्तीचा थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना फोन…..

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आवाज काढत बदलीसाठी एका व्यक्तीने थेट मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना फोन केला. या फोनमुळे एकच खळबळ उडाली असून अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु आहेत. या बदल्यांच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना फोन केला. ‘मी शरद पवार बोलत असल्याचं सांगून या व्यक्तीने अमुक एका अधिकाऱ्याची अमुक ठिकाणी बदली करावी असं सांगितलं’.

संशय आल्याने आशिष कुमार सिंह यांनी फेरतपास केला असता शरद पवार यांच्याकडून असा कोणताही फोन आला नसल्याची त्यांना माहिती मिळाली. हा फेक फोन असल्याचं समोर आल्यानंतर आशिष कुमार सिंह यांनी गावदेवी पोलीस स्थानकात (Gamdevi Police Station) तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून पोलीस या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Leave a Comment