Palghar Nargrik

Breaking news

पालघर :-कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर 114 वी जयंती निमित्त तलासरी येथे चौक चे अनावरण…

तलासरी नाका येथे गोदूताई परूळेकर यांचे नाव देण्यात आले.गोदूताई परुळेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या महिला वकील होत्या.त्यांनी आपली सुखी संपन्न जीवन सोडून यांनी पालघर व ठाणे जिल्हा येथे सावकार व जमीनदार यांच्या अत्याचार विरूद्ध आवाज उठवत आदिवासी समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.गोदूताई परुळेकर 114 वी जयंती निमित्त नगर पंचायत तलासरी मार्फत ह्या चौक चे आणवरन करण्यात आले. यावेळी डहाणू मतदार संघाचे आमदार . कॉ.विनोद निकोले ,अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. डॉ.अशोक ढवळे, किसान सभेचे नेते किसन गुजर, सीपीएम जिल्हा सेक्रेटरी बारक्या मांगात, कॉ.लक्ष्मण डोंभरे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कॉ. रामु पगी,पंचायत समिती तलासरी सभापती नंद कुमार हाडल, पंचायत समिती सदस्य शरद उंबरसाडा ,स्मिता वळवी, उपनगाध्यक्ष सुरेश भोय,नगर सेवक सुहास सुर्ती,गुलाब डाके, सुरेंद्र निकुंभ, रिजवना खाटीक, वनशु दुमाडा, विलास ठाकरे, मुस्ताक शेख,गुड्डू शेख,भिमशिंग कुऱ्हाडे, सुभास दुमाडा व तलासरी नगरपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Comment