दिनांक १३/०८/२०२१ रोजी ०१.३० वाजण्याचे दरम्यान कासा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मुंबई – गुजरात महामार्गावरील मुंबई बाजुकडे जाणा – या वाहीनीवर मौजे चारोटी गावचे हद्दीत एशियन पेट्रोल पंपसमोर संशयीत वाहनांची तपासणी करत होते . तपासणी दरम्यान यातील आरोपीत यांनी आपसात संगणमत करुन आरोपीत क्र . १ याचे ताब्यातील टेम्पो क्र.एम.एच .०४ एच.वाय . ६३८१ यातुन स्वत : च्या फायद्याकरीता महाराष्ट्र शासनाने विक्री व खाण्याकरीता प्रतिबंधीत केलेला पुकार पान मसाला व सुगंधी सुपारी असा एकुण ११,४१,२०० / रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पदार्थाचा माल वाहनामध्ये मिळुन आला . सदरचा माल हा मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला आहे . हे माहीत असतानाही शासकीय आदेशाची अवहेलना करुन विक्री करण्यासाठी वाहतुक करुन घेवुन जात असताना मिळून आले . यामध्ये एकुण दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले . आरोपीत याचे ताब्यातुन १ ) २,८८,००० / – रुपये कि.चे पुकार पान मसाला या सुगंधी सुपारीच्या ८ गोणी , प्रत्येक गोणीत ३०० पॅकेट २ ) ७२,००० / – रु . कि . पुकार चॉईग टोबॅकोचे २,४०० पाऊच ३ ) ३,१ ९ , २०० / – रुपये कि . बनारसी आशिक या सुगंधी सुपारीच्या ३८ गोणी , प्रत्येक गोणीत २१० पॅकेट , ४ ) १,५ ९ , ६०० / -रु . कि . चोविंग तंबाखुचे एकुण ७ , ९ ८० पॅकेट ५ ) ३,०२,४०० / -रुपये कि . केसर युक्त अंकल गोल्ड या सुगंधी सुपारीच्या १८ गोणी , प्रत्येक गोणीत ३०० पॅकेट , असे एकुण ५,४०० पॅकेट ६ ) १०,००,००० / – रुपये कि . चा एक नारंगी रंगाचा अशोक लेलन कंपनीचा कंटेनर बॉडी टेम्पो क्र . एम . एच . ०४ एच . वाय . ६३८१ कि . सु . असा एकुण २१,४१,२०० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . आरोपीत याचे विरुध्द कासा पोलीस ठाणे गु.र.नं. | १३४/२०२१ भा.द.वि.स कलम ३२८ , १८८ , २७२ , २७३,३४ सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६ ( २ ) , २७,२३,२६ ( २ ) ( ४ ) , ३० ( २ ) ( अ ) सहवाचन मा.अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचना अ.सु.म.अ. / अधिसुचना / ७ ९ ४ / २०१८ / ७ दिनांक -२० / ०७ / २०१८ व अधिसुचना क्र . अ . सु . मा . का . / अधिसुचना / ७ ९ ५ / २०१८ दिनांक -२० / ०७ / २०१८ regulation 20.2,3,4 of food safety and standard ( prohibition and restrictions on sales ) regulation 2011 सहवाचन regulation no.3,1,7 of food safety and standards ( food product standards and food additives ) regulation 2011 नुसार , गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हयातील आरोपीत यास दिनांक १३/०८/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे . सदरची कारवाई स.पो.निरी / सूनिल गोसावी , प्रभारी अधिकारी , कासा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी केली आहे .