पालघर,दि.१७: पालघर मध्ये कोरोना महामारीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळवण्यासाठी अनेक नागरिकांना फरपट करावे लागत आहे. पहाटे लवकर रांगेत उभे राहूनही बरेच लोकांना लसींपासून वंचित राहावे लागत आहे, यात महिला व ज्येष्ठ नागरिकांचा ही समावेश आहे, म्हणून पालघर येथील नंडोरे गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व रिक्षा चालकांसाठी सनसाई ग्रुप पालघर व सोहम फूड नंडोरे यांनी आस्था हॉस्पिटल मनोर यांच्या सौजन्याने विनामूल्य लसीकरण शिबीर आयोजित केले. यावेळी १५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
पालघर येथे लसी अपुऱ्या उपलब्ध होत असल्याने नागरिकांना खास करून ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाला ताटखळत बसावे लागत आहे, शिवाय दिवसभर थांबून शेवटी रिकामी घरी परतावे लागत असल्याने नंडोरे गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच रिक्षा चालकांनी सनसाई ग्रुपचे अध्यक्ष संदीप प्रकाश पाटील यांना विनामूल्य लसी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह केला, त्यांच्या या आग्रहाला मान देत संदीप प्रकाश पाटील यांनी सनसाई ग्रुप पालघर व सोहम फूड यांच्या वतीने तसेच आस्था हॉस्पिटल मनोर यांच्या सौजन्याने नंडोरे गावात स्वखर्चाने लसीकरण शिबीर आयोजित केले. या शिबिरात गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, रिक्षा चालक तसेच आदिवासी बंधु भगिनीं अशे ऐकून १५० लोकांना विनामूल्य लसी देण्यात आले.