मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर महाड, पुणे नाशिकमध्ये राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. राणेंचं विधान गंभीर, अटक करून कोर्टासमोर हजर करा, असा आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. रायगड जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या कानशीलात लगावण्याच्या वादग्रस्त वक्तव्यानं युवासेना आक्रमक, युवासैनिकांना आज जुहूत जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-नारायण राणे आणि शिवसेना संघर्ष वाढणार आहे. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची नारायण राणेंची भाषा चांगलीच भोवली आहे. महाड, नाशिक, पुणेमध्ये नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आले आहेत. राणेंचं विधान गंभीर, अटक करून कोर्टासमोर हजर करण्याचे नाशिक पोलिसांचे आदेश देण्यात आले आहेत. राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर पोलिसांचा ताफा तसेच समर्थकांनी देखील हजेरी लावली आहे.
नारायण राणेंविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल
– केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधात सेना आक्रमक
– नाशिकनंतर पुण्यातही राणे विरोधात गुन्हा दाखल
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
– पुण्यातील रोहित कदम या शिवसैनिक यांनी दिली तक्रार
– कलम 153 आणि 505 नुसार गुन्हा दाखल
अमरावती शिवसेनेने पेटवले भाजप कार्यालय
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संदर्भात भाजप चे मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात अमरावती भाजपचे कार्यालय शिवसेना स्टाईलने पेटवून फोडण्यात आले. शेकडो शिवसैनिकांना घेऊन तुफान आंदोलन करण्यात आले.