Palghar Nargrik

Breaking news

मा. जि. प. सदस्या सौ विनया पाटील यांच्या पुढाकाराने पालघर जिल्हा अध्यक्षा मा. सौ. वैदेही वाढाण मॅडम यांनी सावरे- एंबुर गावातील विविध समस्यांचा आढावा घेतला..

आज दि. 24/8/2021 रोजी गावामधे प्रत्यक्ष भेट दीली . सोबत सौ. रंजना म्हस्कर सभापती पंचायत समिती पालघर ,सौ. प्रतिभा गुरोडा कृषी व पशुसंवर्धन सभापती, पं. समिती सदस्य दिलीप पाटील, भालचंद्र मढवी, तुषार पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास हरिश्चंद्र पाटील, नितेश पाटील, प्रविण सांबरे, विश्वास दुतकर, रुपेश कोंढारी, सुदर्शन वनगा, राजश्री रामदास बोंड, सुरेश बर्डे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दयनिय झालेल्या रस्त्याच्या अवस्थेकडे प्रामुख्याने लक्ष देऊन संबंधीत ठेकेदार व प्रशासकीय अधिकारींवर संताप व्यक्त करून त्वरीत रस्त्याच्या कामावर लक्ष देऊन ती समस्या सोडवण्यासाठी पावले उचलली. एंबुर दुतकरपाडा येथील ओढ्यावर पुलाची आवश्यकता असताना त्या ठिकाणी पाईप टाकून मोरी बनवल्यामुळे त्या पाड्यातील घरांमधे वारंवार पुराचे पाणी शिरून लोकांचे अतोनात नुकसान होत असते, त्याची सुद्धा दखल घेऊन त्या ठिकाणी तसेच इतर काही ठिकाणी पुलाची व्यवस्था करण्यास प्रशासकीय सहकार्य करून ते कामही पुर्णत्वास नेण्यासंबंधी पावले उचलली.
पुरामधे वाहून गेलेल्या महीलेच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन शासकीय मदतीसंबधी आश्वासन दीले
याचबरोबर शाळा, अंगणवाडी केंद्र, पाणीपुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेस या ठीकाणच्या कमतरता यासंबंधीतील समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रीत केले.

Leave a Comment