मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी १५ ठिकाणी करणार आंदोलन.
प्रशासनाचे आणि आय आर बी कंपनीचे लक्षवेधन्यासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन
उसगव / दिनांक ६ सप्टेंबर
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या महामार्गाचे व्यवस्थापनात हलगर्जीपणा करण्याऱ्या आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड च्या विरोधात श्रमजीवी संघटना उद्या दिनांक ७/९/२०२१ रोजी या राष्ट्रिय महामार्गावर एकाचवेळी तब्बल १४ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
उद्या मंगळवारी हे आंदोलन राष्ट्रीय म्हामर्गवर संपूर्ण पालघर जिल्ह्यात एकाचवेळी अनेक ठिकाणी होणार आहे. यात वसई तालुक्यात ससुनवघर, चिंचोटी, शिरसाड , पेल्हार, सकवार खानिवडे टोल नाका, पालघर तालुक्यात वराई फाटा, मस्तान नका, चिल्लार फाटा, सोमटा, डहाणू तालुक्यात दापचरी, तलासरी तालुक्यात आमगाव आणि अच्छाड या ठिकाणी करणार करणार आहोत अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश रेंजड यांनी दिली आहे.
तसेच सदर रास्ता रोको आंदोलनाबाबत संघटनेने आय आर बी कंपनी प्रशासनाला तसेच, पोलिस प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्याhत आले आहे. यावेळी प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी आय आर बी च्या प्रतिनिधींनी हजर राहण्याबाबत सूचना देण्यात देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.