Palghar Nargrik

Breaking news

डिजिटल वर्गाच्या माध्यमातून साक्षरता वाढविणार – आमदार विनोद निकोले…..

08 सप्टेंबर साक्षरता दिनी प्रतिपादन

डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – डिजिटल वर्गाच्या माध्यमातून साक्षरता वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी 08 सप्टेंबर साक्षरता दिनाचे औचित्य साधून डिजिटल वर्गाचे उद्घाटन केले आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, तळागळा तील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीने शिक्षण मिळाले पाहिजे त्यानुषंगानेच शहरीभागातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. येणारा काळ अत्यंत कठीण आणि स्पर्धेचा असणार आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर आतापासूनच तयारीला लागून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित झाले पाहिजे. जीवनात जिंकायचे असेल तर मनामध्ये इच्छा शक्ति ठेवून जिद्द बाळगून विचार आशावादी असल्यास आपण काहीही करू शकता असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच डिजिटल शिक्षण देत असताना शिक्षकांनी सुद्धा त्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे कारण एक शिक्षक विद्यार्थी घडवत असताना देश घडवत असतो. तर पालकांनी आपला पाल्य उच्च शिक्षित झाला पाहिजे असा निर्धार केला पाहिजे, विद्यार्थी हा एक गरुडा सारखा असतो त्याला फक्त एक चालना दिली पाहिजे तेव्हाच तो उंच झेप घेऊ शकतो असे संगितले. तसेच जीवनात यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळेचे भान ठेवले पाहिजे असा सल्ला ही निकोले यांनी दिला. आजकाल आपण बघतो विद्यार्थी एखादा चित्रपटा पासून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न कर असतो त्याच धर्तीवर ऐकून, बघून सहज आकलन करता येईल असे डिजिटल शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. असे आ. निकोले यांनी सांगत डिजिटल वर्गाचे धडे घेतले. गोखले एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, कोसबाड व शेतकी शाळा तलासरी येथे डिजिटल वर्ग करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 06 लक्ष निधी देण्यात आला त्याचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थित करण्यात आला.

याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे आचार्य शंकर रामचंद्र भिसे माध्यमिक विद्यालय कोसबाड येथे प्राचार्य वीणा माच्छी, गटशिक्षणाधिकारी डहाणू बी.एच. राठोड, कंक्राडी केंद्र प्रमुख उमेश गावड, कृषी केंद्राचे समन्वयक विलास जाधव, तर जिल्हा परिषद माध्यमिक शेतकी शाळा तलासरी मुख्याध्यापक जिवल भोये, पालघर जिल्हा परिषद सदस्य तथा समाजकल्याण सभापती रामू पांगी, जिल्हा परिषद सदस्य अनिल जिरवा, माजी सरपंच तलासरी सुभाष मालावकर यांच्या सह शिक्षक वृंद यांच्या सह माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखाना, कॉ. विजय वाघात, डॉ. आदित्य अहिरे उपस्थित होते.

कोट :–
डिजिटल क्लासरुमच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि स्मार्ट शिक्षण मिळू लागले आहे. शिक्षक अधिक टेन्कोसॅव्ही झाले आहे. आंतरराष्ट्रीय सुलेखनकार अच्युत पालव आणि त्यांच्या सहकार्यांनी शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. विविध विषयांच्या धड्यांमधील मजकूर भिंतीवर अर्थपूर्ण चित्रांतून कलात्मक पध्दतीने चितारला आहे. असे मत गोखले एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, कोसबाड प्राचार्य वीणा माच्छी यांनी मांडले.

Leave a Comment