कोविड काळातील (Coronavirus) शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मार्डच्या निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra resident doctors threaten to go on strike from next week) शैक्षणिक शुल्क माफीची मागणी मान्य न झाल्याने संप अटळ आहे. राज्यातील 5 हजारांहून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही मागणी मान्य न झाल्याने संपाचे हत्यार उपसावे लागले आहे, अशी माहिती मार्डकडून (MARD) देण्यात आली आहे. त्यानुसार पुढच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मार्डच्या निवासी डॉक्टर संपाच्या तयारीबाबत सेंट्रल मार्डच्या रा ज्यस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोविड काळातील निवासी डॉक्टर यांनी रुग्ण सेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक शुल्क माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, कोविडची लाट ओसरताच याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. हे शुल्क माफ करावे, अन्यथा संप पुकारला जाईल, असा इशारा मार्डने दिला आहे.
कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक फी माफीचे आश्वासन दिले होते. पण, अजूनही फी माफीचा निर्णय झाला नसल्याने 5 हजारहून अधिक मार्डच्या निवासी डॉक्टरांनी राज्यस्थरीय संपाचा इशारा दिला आहे, असे पत्रक मार्डकडून जारी करण्यात आले आहे.